Vijay Patkar Exclusive : चित्रपट महामंडळानं दहा वर्षात काय केलं? विजय पाटकरांचा हल्लाबोल
Vijay Patkar Exclusive : ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर आणि अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याव
Vijay Patkar Exclusive : ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर आणि अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. लेट्सअप मराठीशी बोलताना त्यांनी महामंडळाची कामं, सदस्यांकडून गोळा केली जाणारी फी, त्याबदल्यात सदस्यांना मिळणारे फायदे काय? अशा विविध मुद्द्यांवरुन विजय पाटकर यांनी प्रश्न उपस्थितीत केले आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना विजय पाटकर (Vijay Patkar) म्हणाले की, अगोदरचे अध्यक्ष आहेत त्यांनी काही केलं नाही. 10 वर्षा इलेक्शन होते. पाच वर्षात गेल्या काहीही झालं नाही. फक्त फी घेतली आणि कार्ड सुद्धा दिले नाहीत. जर तुम्ही कार्ड देऊ शकत नाही, तुम्ही पैसे देऊ शकत नाही त्या जो कोण कार्ड छापतो, मग तुम्ही फी का घेतल्यात.
ते फी का घेतलेत तर सांगा ना पण नाही फी येऊन दे फी येऊन दे. दाखवायचं की माळ किती फायदेशीर आहे. पण नुसते फी करून फायदे नाही होत. त्यामुळे नुसते ऑफिसेस घेतले म्हणजे विकास झाला असं नाहीय. बाकीचे इंडस्ट्रीच काय झालं? थिएटर मिळत नाही. त्याबद्दल तुम्ही काय केलं. आज एवढे इंडस्ट्री प्रॉब्लेम आहेत.
क्रिकेटच्या इतिहासात नवीन विक्रम; अवघ्या पाच चेंडूत ‘या’ संघाने मारली बाजी
100 प्रॉब्लेमपैकी 10 प्रॉब्लेम सोडवले म्हणजे प्रॉब्लेम सॉल झाले असं म्हणायचं आहे का? असं प्रश्न विचारात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर हल्लाबोल केला. तसेच आज नेमकं चित्रपट महामंडळ काय काम करते हेच अनेकांना माहिती नाही असं देखील लेट्सअप मराठीशी बोलताना विजय पाटकर म्हणाले.