2027 ची जनगणना यंदा अधिक मोठी, नागरिकांना विचारले जाणार 40 प्रश्न, 15 दिवसांच्या स्वयं-गणनेची सुविधाही!

यावेळी नागरिकांना स्वतःहून ऑनलाईन माहिती नोंदवता यावी, यासाठी 15 दिवसांची स्वयं-गणना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 31T143300.833

The 2027 census will be bigger this year : देशातील आगामी जनगणनेच्या तयारीला वेग आला असून, यंदाची जनगणना मागील जनगणनेच्या तुलनेत अधिक व्यापक आणि सविस्तर असणार आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी केली जाणार असून, ही प्रक्रिया सुमारे दीड महिना चालणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना स्वतःहून ऑनलाईन माहिती नोंदवता यावी, यासाठी 15 दिवसांची स्वयं-गणना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जातीविषयक माहितीसह एकूण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. 2011 च्या जनगणनेमध्ये ही संख्या 29 होती. त्यामुळे यावेळी प्रश्नावलीत 11 नवीन प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून देशातील सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याविषयक परिस्थितीची अधिक सखोल माहिती संकलित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक राज्य आणि प्रदेशांनुसार निश्चित करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडसह काही राज्यांमध्ये अहंगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनगणनेचे वेळापत्रक लवकर ठेवण्यात आले आहे. या चार राज्यांमध्ये घरोघरी जाऊन जनगणना करण्याची प्रक्रिया 35 दिवस चालणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत जनगणना होणार आहे. मात्र, काही राज्ये आणि बर्फवृष्टीग्रस्त भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

वर्षभर मुंबई पोलिसांना जमलं नाही, तुकाराम मुंढेंनी आठवड्यात करून दाखवलं, कॅन्टीनला 75 हजारांचा दंड!

2027 च्या जनगणनेतील महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयं-गणना सुविधा. यामध्ये नागरिकांना सरकारी यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता स्वतःची माहिती ऑनलाईन भारत येणार आहे. स्वयं गणनेचा कालावधी 10 ते 24 जानेवारी 2027 असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीनंतर जनगणना कार्मचारी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार आहेत. जनगणनेसाठी 1 मार्च 2027 ही संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 1 ते 5 मार्च 2027 या कालावधीत पुनरावलोकनाची प्रक्रिया पार पडणार आहे.

दरम्यान, साध्याच्य जनगणना कार्यक्रमातून मणिपूर राज्याला वगळण्यात आले आहे. राज्यातील विविध संघटनांकडून आधी राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच एनआरसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मणिपूरमधील जनगणनेबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील बर्फवृष्टीग्रस्त आणि दुर्गम भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

एकूणच, 2027 ची जनगणना अधिक प्रश्न, स्वयं-नोंदणीची सुविधा आणि विस्तारित कालावधीमुळे महत्त्वाची ठरणार आहे. या जनगणनेतून देशातील लोकसंख्येचे चित्र, सामाजिक रचना आणि आर्थिक परिस्थिती याबाबत अधिक व्यापक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

follow us