क्रिकेटच्या इतिहासात नवीन विक्रम; अवघ्या पाच चेंडूत ‘या’ संघाने मारली बाजी

UAE women vs Saudi Arabia women : संयुक्त अरब अमिरात महिला क्रिकेट संघाने 2026 च्या एशियन क्रिकेट कौन्सिल वुमेन्स प्रीमियर कप स्पर्धेत

UAE Women Vs Saudi Arabia Women

UAE women vs Saudi Arabia women : संयुक्त अरब अमिरात महिला क्रिकेट संघाने 2026 च्या एशियन क्रिकेट कौन्सिल वुमेन्स प्रीमियर कप स्पर्धेत एक नवीन इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सौदी अरेबियाविरुद्ध खेळताना यूएईने अवघ्या पाच चेंडूंमध्ये लक्ष्याचा पाठलाग करत सामना 10 विकेट्सने जिंकला आहे. या सामन्याची अधिकृतपणे रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करण्यात आली आहे. या सामन्यानंतर यूएई संघ टी20 आंतरराष्टीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद यशस्वी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचल आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सौदी अरेबियाचा संघ 27 धावावर ऑल आऊट झाला. यूएईकडून तीन गोलंदाजांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स मिळवले. तर प्रत्युत्तरात यूएईने हा सामना केवळ पाच चेंडूंमध्ये जिंकला. प्रथम फलंदाजी करताना, सौदी अरेबियाच्या महिला संघाने पहिल्या सहा षटकांत केवळ तीन गडी गमावले होते. तर 10 व्या षटकापर्यंत, चार गडी गमावून त्यांनी 20 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर यूएईच्या गोलंदाजांनी सौदी अरेबियाच्या संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. सौदी अरेबियाच्या महिला संघाने आपल्या शेवटच्या 33 चेंडूंमध्येच सहा गडी गमावले. प्रथम फलंदाजी करताना, सौदी अरेबियाचा महिला संघ एकूण केवळ 27 धावांवर सर्वबाद झाला.

यूएईकडून कोट्टे, हिना आणि ईशा या प्रत्येकीने तीन-तीन विकेट्स मिळवले. सौदी अरेबियाच्या संघाकडून, एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्णधार आणि सलामीची फलंदाज मशाल वकास ही 9 धावांसह संघाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली, तर संघातील पाच फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही. 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईने अवघ्या 5 चेंडूंमध्येच विजय मिळवला. यूएईने केवळ सामनाच जिंकला नाही, तर एक नवीन विक्रमही आपल्या नावे केला.

… तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात, शिंदे – ठाकरेंनी चर्चा करावी; ठाण्यातील बैठकीनंतर नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार ?-

महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ‘बाकी असलेल्या चेंडूंच्या’ (balls remaining) संदर्भात हा चौथा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी, इतर तीन संघांनी लक्ष्याचा पाठलाग याहूनही अधिक वेगाने केला आहे; रवांडा, टांझानिया आणि थायलंड या संघांनी असे सामने जिंकले आहेत, जिथे लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना केवळ चारच वैध चेंडूंची आवश्यकता भासली होती.

follow us