Ali Larijani : ‘टॉफी’ देणाऱ्यांना झुकवणारा लारिजानी ठार; ‘रणनीतीकारा’ च्या मृत्युने इराणचा गेम ओव्हर?

Ali Larijani इराणच्या अंतर्गत आंदोलनांना चिरडण्यासाठी आणि इस्रायलविरोधी गटांना रसद पुरवण्यात त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले.

  • Written By: Published:
Ali Larijani : 'टॉफी' देणाऱ्यांना झुकवणारा लारिजानी ठार; 'रणनीतीकाराच्या मृत्युने इराणचा गेम ओव्हर?

Who is Ali Larijani & Why His Death Is Big Loss For Iran : दशकानुदशके पाश्चात्य जगाला आपल्या बोटावर नाचवणारा आणि अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून इराणचा ‘अण्वस्त्र’ कार्यक्रम जिवंत ठेवणारा इराणच्या सत्तेचा सर्वात मजबूत किल्ला उद्ध्वस्त झाला आहे. इराणचा ‘चाणक्य’ म्हणजे अली लारिजानी  इस्त्राइल्या हल्ल्यात ठार झाले आहेत. लारिजानी यांचा हा अंत केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही, तर इराणच्या चाणक्यचा अंत आहे. लारिजानी यांचा मृत्यू हा सर्वोच्च नेते खोमेनींच्या जाण्यापेक्षाही मोठा का मानला जातोय? त्यामुळे आता इराणचा ‘पॉवर गेम’ संपलाय का? जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये…

लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!

अली लारिजानी हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते इराणच्या ‘डीप स्टेट’चे भाग होते. मध्य-पूर्वेतील युद्धावेळी इस्रायलच्या एका अचूक एअर स्ट्राईकमध्ये इराणचे सिक्युरिटी चीफ अली लारिजानी ठार झाले आहेत. खुद्द इराणच्या ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ने याला दुजोरा दिला आहे. अली लारिजानी हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर ते इराणच्या सत्तेचे ‘रिमोट कंट्रोल’ होते.

इराणच्या इतिहासात सलग 12 वर्षे ‘मजलीस’ (संसद) चालवणारे ते एकमेव नेते होते. एवढेच नव्हे तर,  आयतुल्ला खोमेनी यांचे ते अत्यंत विश्वासू सल्लागार होते. तसेच लष्कर (IRGC) आणि सरकार यांच्यातील ते महत्त्वाचा दुवा होते. 2015 च्या ऐतिहासिक अण्वस्त्र कराराच्या वेळी लारिजानी यांनी पडद्यामागून हालचाली केल्या. अमेरिकेला झुकवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच  इराणला अमेरिकेच्या निर्बंधातून वाचवण्यासाठी त्यांनी चीनसोबत केलेल्या महाकाय कराराचे ते मुख्य सूत्रधार होते. इराणच्या अंतर्गत आंदोलनांना चिरडण्यासाठी आणि इस्रायलविरोधी गटांना (हमास, हिजबुल्लाह) रसद पुरवण्यात त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले.

आखातातील युद्धसंकटामुळे तेथील भारतीय चिंतेत; भारतात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या 30% ने वाढली

इराणचे अपरिमित नुकसान

लारिजानींच्या जाण्याने इराणला झालेले नुकसान हे मुख्यतः तीन स्तरांवरील आहे ज्यामध्ये राजकीय पोकळी, बौद्धिक ताकद आणि अनुभवी चेहरा हे मुख्य पैलू आहेत कारण, इराणमध्ये सध्या ‘मवाळ’ आणि ‘जहाल’ असे दोन गट आहेत. या दोन्ही गटांना एकत्र बांधून ठेवणारा लारिजानींसारखा दुसरा मोठा नेता सध्या इराणकडे नाही. याशिवाय कासिम सुलेमानींच्यानंतर लारिजानींच्या जाण्याने इराणची ‘बौद्धिक ताकद’ संपुष्टात आली आहे. तसेच पाश्चात्य देशांशी वाटाघाटी करू शकणारा एकही अनुभवी चेहरा आता इराणकडे उरलेला नाही, ज्यामुळे इराण आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक एकटा पडू शकतो. लारिजानी यांचे केवळ इराणमध्येच नाही, तर चीन आणि रशियाच्या सत्ताधीशांशी वैयक्तिक आणि घनिष्ठ संबंध होते. इराणला आंतरराष्ट्रीय स्तरावर मित्र मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

मुत्सद्देगिरीचा मास्टरमाइंड, ‘मोत्याच्या बदल्यात टॉफी’

लारिजारी यांनी तब्बल दशकभर इराणच्या सरकारी ब्रॉडकास्टरचे प्रमुख म्हणून काम केले. देशात काय दाखवायचे आणि काय नाही, हे त्यांच्या इशाऱ्यावर ठरायचे. 2004 मध्ये त्यांनी हे पद सोडून थेट सर्वोच्च नेते खोमेनी यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून सूत्रे हाती घेतली. 2005 मध्ये ते इराणचे मुख्य अणु-वार्ताकार बनले. लारिजानींच्या मुत्सद्देगिरीचा दरारा असा होता की, अण्वस्त्र करारावेळी जेव्हा पाश्चात्य देशांनी इराणला काही सवलती दिल्या, तेव्हा लारिजानी यांनी ‘हा करार म्हणजे मौल्यवान मोत्याच्या बदल्यात टॉफी घेण्यासारखा असल्याचे ठणकावून सांगितले होते’ अमेरिकेच्या नाकावर टिच्चून चीनसोबत 25 वर्षांचा महाकाय करार करणारे लारिजानी हे  ‘मास्टरमाइंड’ होते. त्यामुळे लारिजानींचा मृत्यू हा इराणसाठी कासिम सुलेमानींच्या हत्येनंतरचा सर्वात मोठा विध्वंसक धक्का  मानला जात आहे.

सद्दामसारखं संपवायला आले अन् स्वतःच अडकले! जनरल जाफरींनी रचलेलं ते ‘चक्रव्यूह’ काय आहे?

इस्रायलचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि ट्रम्प फॅक्टर

तज्ज्ञांच्या मते, हा हल्ला अत्यंत विचारपूर्वक करण्यात आलेला हल्ला आहे. युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या ऐली गेरानमायेह म्हणतात की, अमेरिकेत ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यावर इराणसोबत जो काही संवाद किंवा सीझफायर (Ceasefire) झाला असता, तो यशस्वी करण्याची ताकद फक्त लारिजानींकडे होती. मात्र, दुसरीकडे यामागे इस्त्राइचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा प्लॅन वेगेळाच होता. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना इराण आणि अमेरिका यांच्यातील कोणतीही तडजोड नको होती आणि म्हणूनच, जो माणूस ही तडजोड घडवून आणू शकला असता, त्या लारिजानींनाच इस्रायलने वाटेतून बाजूला केले आहे.

एके काळचे जिवलग मित्र आता कट्टर शत्रू, अमेरिका इराणच्या दुश्मनीचा इतिहास काय?

अमेरिकेचा विजय की डोकेदुखी? लारिजानींच्या अंताने इराणसोबतचा संवादाचा पूलच उडाला!

अली लारिजानी यांच्या मृत्यूचा परिणाम केवळ इराणवरच नाही, तर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरही (Foreign Policy) दुहेरी पद्धतीने होणार आहे. अमेरिकेसाठी याचे काही फायदे आहेत, तर काही अत्यंत गंभीर तोटेदेखील आहेत.

– लारिजानी हे इराणच्या ‘ब्रेन ट्रस्ट’चे मुख्य भाग होते. त्यांच्या निधनामुळे इराणची आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटाघाटी करण्याची क्षमताकमकुवत झाली आहे. त्यामुळे अमेरिकेला आता इराणवर अधिक दबाव आणणे सोपे जाईल.

– लारिजानी यांनी चीनसोबत जो 25 वर्षांचा करार केला होता, तो अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी होती. हा करार अंमलात आणणारा मुख्य दुवाच निखळल्यामुळे चीन आणि इराणमधील धोरणात्मक भागीदारीत काहीकाळ अडथळे येऊ शकतात, जे अमेरिकेच्या हिताचे आहे.

– लारिजानी हे अण्वस्त्र कार्यक्रमाचे राजकीय संरक्षक होते. त्यांच्या जाण्याने इराणच्या अण्वस्त्र धोरणात गोंधळ निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे अमेरिकेला इराणच्या न्यूक्लियर प्रोग्रेसवर अंकुश ठेवण्यासाठी वेळ मिळेल.

– अली लारिजानी हे इराणमधील अशा मोजक्या नेत्यांपैकी होते जे पाश्चात्य जगाशी (West) संवाद साधू शकत होते. ते ‘प्रॅगमॅटिक’ नेते मानले जात. त्यांच्या मृत्यूनंतर, इराणमधील ‘जहाल’ गट अधिक प्रबळ होईल, जे अमेरिकेसोबत चर्चा करण्याऐवजी थेट संघर्षाचा मार्ग निवडतील.

– तज्ज्ञांच्या मते, जर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आले आणि त्यांना इराणसोबत एखादा नवा करार करायचा असेल, तर लारिजानी हे त्यासाठी सर्वोत्तम मध्यस्थ ठरू शकले असते. पण आता अमेरिकेकडे इराणमध्ये विश्वासार्ह असा कोणताही ‘दुवा’ उरलेला नाही.

काही वर्षांपूर्वी इराण  सैन्याचे कमांडर कासिम सुलेमानी यांचा  मृत्यू झाला होता त्यावेळी इराणने मैदानातील ‘तलवार’ गमावली होती, पण आता अली लारिजानींच्या रूपाने इराणने ‘चाणक्य’ गमावला आहे. युद्धाच्या रणांगणात मुत्सद्देगिरी आणि रणनीतीचा हा बादशहाच संपल्यामुळे आता इराणची युद्धनीती कोलमडणार का? की इराण आता थेट इस्रायलच्या अस्तित्वावर घाला घालणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us