Iran War : आखातातील युद्धाची रणनीती बदलली; ‘डेटा’ सेंटर्सवरील हल्ल्यामागे इराणचा मेगा मास्टर प्लॅन

Iran War मध्यपूर्वेतील तणाव आता केवळ सीमावादापुरता उरलेला नाही, तर तो 'डेटा वॉर' च्या एका नव्या आणि धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे.

  • Written By: Published:
Iran War : आखातातील युद्धाची रणनीती बदलली; 'डेटा सेंटर्सवरील हल्ल्यामागे इराणचा मेगा मास्टर प्लॅन

Why Iran Targeting Gulf Countries Data Center’s : मध्यपूर्वेतील युद्ध आता एका नव्या आणि अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचले आहे. इराणने आपल्या युद्धनीतीत मोठा बदल केला असून, आता पारंपारिक लष्करी तळांऐवजी खाडी देशांतील ‘डेटा सेंटर्स’ आणि तांत्रिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) दुबईतील अमेरिकन कंपनी ‘ओरेकल’ (Oracle) आणि बहरिनमधील ‘ॲमेझॉन’ च्या (AWS) डेटा सेंटर्सवर ड्रोन हल्ले केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. नेमकं इराणने त्यांच्या युद्धनीतीमध्ये काय बदल केला आणि आखाती देशांमधील डेटा सेंटर्सवर हल्ला करून इराणला काय साध्य करायचं आहे त्याबद्दल जाणून घेऊया…

युद्धविराम न झाल्यास असं दुष्टचक्र सुरू होईल की…; IMF ने रिपोर्टमध्ये जगाला दिला सर्वात मोठा ‘अलर्ट’

विचारपूर्वी आखलेली रणनीती 

इराण आणि खाडी देशांमधील संघर्ष आता पारंपारिक सीमा ओलांडून ‘डिजिटल रणांगणावर’ पोहोचला आहे. इराणची ही नवीन रणनीती केवळ आकस्मिक नसून ती अत्यंत विचारपूर्वक आखलेली दिसून येतीये. कारण आजच्या युगात डेटा हा केवळ माहितीचा साठा नसून तो सत्तेचा मुख्य स्रोत बनला आहे. आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि क्लाउड कॉम्प्युटिंग हे केवळ व्यापारी गरजेपुरते मर्यादित नसून, ते लष्करी हालचाली आणि जागतिक दळणवळणाचा कणा बनले आहेत. खाडी देशांची अर्थव्यवस्था आणि अमेरिकेची लष्करी ताकद या ‘क्लाउड’ डेटावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या डेटा सेंटर्सवर प्रहार करून इराण एकाच वेळी तीन निशाणे साधत आहे.

डेटा सेंटरवर हल्ले अन् ‘एक तीरात, तीन निशाने’

इराणने डेटा सेंटर्सना लक्ष्य करण्यामागे एक अत्यंत खोलवर आणि धोरणात्मक रणनीती आखली आहे, ज्याचे परिणाम केवळ तांत्रिक नसून व्यापक आहेत. आजच्या डिजिटल युगात बँकिंग प्रणाली, सरकारी कामकाज आणि नागरी सेवा पूर्णपणे क्लाउड-आधारित सिस्टमवर अवलंबून आहेत आणि हेच ओळखूनच इराणने या सेवा विस्कळीत करण्यासाठी इमारतींवर थेट स्ट्राइक करण्याचे तंत्र अवलंबले आहे. अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या पुरवत असलेल्या क्लाउड सुविधा या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या कणा आहेत, त्यामुळे या कंपन्यांवरील हल्ल्यातून होणार विनाश शत्रू राष्ट्राला पंगू करू शकतो हाच विचार इराणचा आहे.

लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!

या हल्ल्यांचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा पैलू लष्करी सामर्थ्याशी जोडलेला आहे. आधुनिक युद्धात अमेरिकन सैन्य निर्णयक्षमता, गुप्तचर विश्लेषण आणि टार्गेट ट्रॅकिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर अवलंबून आहेत. या लष्करी उपकरणांचे सर्व प्रोसेसिंग आणि डेटा मॅनेजमेंट सुरक्षित क्लाउडवर होत असते, जे प्रत्यक्ष युद्धभूमीपासून दूर असले तरी डेटा सेंटर्सवर अवलंबून असते. इराणचा मुख्य उद्देश हा ‘डेटा’ नष्ट करून शत्रूची लष्करी रणनीती आणि निर्णय घेण्याची क्षमता मुळापासून उखडून टाकणे आहे. थोडक्यात काय तर, डेटा सेंटर्स उद्ध्वस्त करून इराण एकाच वेळी आर्थिक नाकेबंदी आणि लष्करी अपंगत्व आणण्याचा प्रयत्न करत आहे.

follow us