भाजप-काँग्रेस संघर्ष पुन्हा पेटणार! पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर हल्ला

पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या  कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
Pawar

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या (Pune) कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणावरून आता पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज्यसभा निवडणुक आघाडीत ‘सीट शेअरिंग’ची चुरस; ठाकरेंची थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा

पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या  कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा हल्ला भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडे याने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत पवार यांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेचा आम्ही निषेध करतो. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडेना अटक कारवाई, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करीत या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यात काही दिवसापूर्वीच भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. आता पुन्हा एकदा या घटनेने वाद उफाळून आला आहे.

follow us