भारताचा चीन-नेपाळला दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय; दोन्ही देशांना बसणार आर्थिक भुर्दंड

भारताचा चीन-नेपाळला दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय; दोन्ही देशांना बसणार आर्थिक भुर्दंड

India China Tension : चीन ज्या देशांबरोबर व्यापार करतो तिथे कमी किंमतींवर आपली (India China Tension) उत्पादने डंपिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय बाजारांसाठीही चीनने (Indian Market) अशीच शक्कल लढवली होती. पण भारताने स्वस्तातील चीनी वस्तू नाकारून आणि देशांतर्गत उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो चीनी वस्तूंवर बंदी घातली. भारताने चीनच्या कच्च्या स्टीलवरही बंदी घातली आहे. यानंतर चीन आपला माल नेपाळमार्गे भारतात पाठवू लागला. चीनची ही चालाखी भारताच्या लक्षात आली आहे. भारताने घेतलेल्या निर्णयामुळे चीनबरोबरच नेपाळचेही (Nepal) नुकसान होत आहे.

खरंतर नेपाळ मोठ्या प्रमाणात स्टीलची भांडी भारताला निर्यात करतो. परंतु, आता भारताने स्टील प्रोडक्टमध्ये वापरात येणारा कच्च्या मालावर क्वालिटी सर्टिफिकेशन मार्क म्हणजेच गुणवत्ता प्रमाणन चिन्ह अनिवार्य केले आहे.

Bihar : मतदार यांद्यामध्ये मोठा घोळ, व्होटर लिस्टमध्ये नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारच्या नागरिकांची नावे

याआधी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) सर्टिफिकेट फक्त तयार वस्तूंसाठी होते. तयार उत्पादनांसाठी BIS सर्टिफिकेशनचा उद्देश चीनी वस्तुंच्या आयातीवर आळा घालणे हा होता. पण दोन महिन्यांपूर्वी भारत सरकारने BIS सर्टिफिकेशन कच्च्या मालासाठीही लागू केले. यामुळे नेपाळचे स्टीलचे भांडी तयार करणाऱ्या लोकांसमोर निर्यातीचे संकट उभे राहिले आहे.

चीनकडून नेपाळचा असाही वापर..

सन 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीन आणि भारतात संघर्ष झाला होता. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला होता. भारतीय लोकांतही चीनविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. लोकांनी चीनी वस्तूंचा बहिष्कार सुरू केला होता. सरकारने सुद्धा अनेक चीनी मोबाइल अॅप बंद केले होते. याच दरम्यान भारत सरकारने चीनचे जवळपास 370 उत्पादनांवर बंदी घातली होती.

यानंतर चीन आपल्या वस्तू नेपाळमार्गे भारतात पाठवू लागला होता. चीन त्याच्याकडील कच्च्या स्टीलची विक्री नेपाळला करतो. यानंतर नेपाळी व्यापारी या कच्च्या स्टीलपासून भांडी तयार करुन भारताला निर्यात करत होते. हा प्रकार भारताच्या लक्षात आला. त्यानंतर भारतानेही खास रणनीती आखली यामुळे चीनला तर नुकसान सहन करावे लागतच आहे शिवाय नेपाळच्या व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे.

नेपाळच्या भांडी निर्यातदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर द काठमांडू पोस्टला सांगितले की भारत नेपाळकडून अशी कोणतीच वस्तू घेऊ इच्छित नाही ज्यात चीनचा कच्चा माल असेल. यामुळे नेपाळच्या निर्यातदारांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कच्च्या मालासंदर्भातील भारताच्या नियमांनी व्यापारात समस्या निर्माण केल्या आहेत असे नेपाळच्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

श्रीलंका, नेपाळ अन् पाकिस्तान चीनच्या सापळ्यात मित्र देश कंगाल; आता ‘हा’ देश चीनच्या रडारवर..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube