नेपाळचे माजी पीएम केपी ओली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; नक्की काय घडलं?

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Kp Sharma Oli

Nepal News : सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 8 सप्टेंबर रोजी पोलिसांनी जी दडपशाही केली त्याविरोधात माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अपराधांची आरोपांची चौकशीची मागणी करत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. GenZ आंदोलन चिघळल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी केपी ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. जुलै 2024 मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती परंतु, चौदा महिन्यांनंतरच त्यांना खुर्ची सोडावी लागली.

नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की (Sushila Karki) यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी (Nepal News) त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यानंतर कार्की यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. त्या लवकरच आपल्या मंत्रिमंडळाचा (KP Sharma Oli) विस्तार करू शकतात. शनिवारी त्यांनी GenZ प्रतिनिधी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेतून जी काही मते समोर आली त्याचा उपयोग मंत्रिमंडळ विस्तार करताना होईल.

मोठी बातमी! सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; लवकरच शपथविधी होणार

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार 

कार्की यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात कुणाला संधी द्यायची याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या दिवशी नावांची घोषणा केली जाईल त्याच दिवशी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल असे नियोजन असल्याचे समजते. याबाबत अद्याप स्पष्ट घोषणा झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारात विविध क्षेत्रीय आणि जातीय प्रतिनिधींना समाविष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे सरकारच्या स्थैर्यात वाढ होईल.

सुशीला कार्की यांची कारकीर्द

सुशीला कार्की यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी बिराटनगर येथे झाला. सात भावंडात त्या सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1979 मध्ये बिराटनगर येथेच वकिली सुरू केली. 1985 मध्ये त्यांनी महेंद्र मल्टिपल कॅम्पस येथे सहायक अध्यापक म्हणूनही काम केले. 2007 मध्ये कार्की वरिष्ठ वकील बनल्या. 22 जानेवारी 2009 मध्ये त्यांना सु्प्रीम कोर्टाच्या एड हॉक जज म्हणून नियुक्त करण्यात आले. यानंतर 2010 मध्ये त्या स्थायी न्यायाधीश बनल्या. 2016 मध्ये त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या. हा एक ऐतिहासिक क्षण होता. 11 जुलै 2016 ते 7 जून 2017 या काळात त्या या पदावर होत्या.

नेपाळमध्ये आंदोलन करणाऱ्या GenZ मध्ये फूट, दोन गटात तुंबळ हाणामारी; अनेकजण जखमी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube