मोठी बातमी! सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; लवकरच शपथविधी होणार

माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांना नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यावर एकमत झालं आहे.

Sushila Karki

Nepal News Sushila Karki : हिंसाग्रस्त नेपाळमधून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. GenZ आंदोलनानंतर देशात सत्तांतर झाले. यानंतर केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार असा प्रश्न होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. सुशीला कार्की यांना नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यावर एकमत झालं आहे. विशेष म्हणजे, आजच त्यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी GenZ च्या बैठकीत एका गटाने कार्की यांच्या नावाला विरोध केला होता. यावेळी दोन गटात हाणामारी होऊन काही आंदोलक जखमीही झाले होते.

त्यानंतर आज पुन्हा बैठक झाली. या बैठकीसाठी GenZ प्रतिनिधी, सेनाप्रमुख आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह आणखी (Nepal News) काही उपस्थित होते. या बैठकीत सुशीला कार्की (Sushila Karki) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या बैठकीत प्रतिनिधी सभा भंग करणे आणि सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यावर एकमत झाले.

मोठी बातमी! Gen Z ने निवडला नेपाळचा नेता; जाणून घ्या, सुशीला कार्की नेमक्या कोण?

राष्ट्रपती पौडेल म्हणाले, की आता मी प्रतिनिधी सभा भंग करण्याचा निर्णय घेणार आहे. यानंतर लगेचच सुशीला कार्की यांनी पंतप्रधान पदाची शपथ देण्याची तयारी सुरू करणार आहे. नेपाळचे कार्यवाहक सरकार पंतप्रधान यांचा शपथविधी झाल्यानंतर माजी मुख्य न्यायाधीश कार्की या आंदोलकांच्या मागण्या मान्य करून देशात निवडणुका घेतील. GenZ गटाने सुशीला कार्की यांचं नाव पुढे केलं होतं. आता लवकरच राष्ट्रपती पौडेल कार्की यांना पंतप्रधान पदाची शपथ देतील.

सुशीला कार्की यांची कारकीर्द

सुशीला कार्की यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी बिराटनगर येथे झाला. सात भावंडात त्या सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1979 मध्ये बिराटनगर येथेच वकिली सुरू केली. 1985 मध्ये त्यांनी महेंद्र मल्टिपल कॅम्पस येथे सहायक अध्यापक म्हणूनही काम केले. 2007 मध्ये कार्की वरिष्ठ वकील बनल्या. 22 जानेवारी 2009 मध्ये त्यांना सु्प्रीम कोर्टाच्या एड हॉक जज म्हणून नियुक्त करण्यात आले. यानंतर 2010 मध्ये त्या स्थायी न्यायाधीश बनल्या. 2016 मध्ये त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या. हा एक ऐतिहासिक क्षण होता. 11 जुलै 2016 ते 7 जून 2017 या काळात त्या या पदावर होत्या.

नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा; शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मागणी 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube