Earthquake Nepal: नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, बिहारमध्येही हादरली जमीन
Earthquake Nepal: 16 ऑक्टोबर रोजी नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ही घटना ताजी असतांनाच आज पुन्हा एकदा नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, भारतातील बिहार राज्याच्या अनेक भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी सकाळी पाटणासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता कमी होती, त्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
MPSC मार्फत 378 पदांसाठी बंपर भरती, 9 नोव्हेंबर पर्यंत करता येणार अर्ज
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार नेपाळची राजधानी काठमांडू येथे रविवारी रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. आज सकाळी 7:24 वाजता नेपाळच्या काही भागात या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही त्याचे धक्के जाणवले. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर खाली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. या भूकंपामुळं लोकांमध्ये घबराहट पसरली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी मोजण्यात आली. मात्र, सुदैवाने भूकंपामध्ये कोणत्या प्रकारची जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
PDNA अहवालात नमूद केल्याप्रमाणे, नेपाळ हा जगातील 11 वा भूकंपप्रवण देश आहे. येथे दररोज भूकंप होत असतात. 2015 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या काळात सुमारे 9,000 लोक मारले गेले. तर 7 ऑक्टोबर रोजी देखील नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हा भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजली गेली. आज झालेल्या भूकंप हा गेल्या काही वर्षात या परिसरात 4.5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा हा दहावा भूकंप आहे.