107 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांचे 20 हून अधिक खोटे दावे; भारताबद्दलही केला फ्रॉड दावा
Donald Trump राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्टेट ऑफ द युनियन (SOTU) भाषणात स्वतःचेच मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
Donald Trump Told More Than 20 Lines In 107 Minute Speech : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्टेट ऑफ द युनियन (SOTU) भाषणात स्वतःचेच मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. SOTU मध्ये ट्रम्प यांनी पहिल्यांदाच तब्बल 107 मिनिटांचे भाषण ठोकले पण, या भाषणादरम्यान ट्रम्प एकदा दोनदा नव्हे तर, तब्बल 20 हून अधिक वेळा खोटे दाने केले आहे. भाषणादरम्यान ट्रम्प यांनी अमेरिका, इराण आणि युद्धासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. खोट्या दाव्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबविणे याचाही समावेश आहे.
… तर पाकिस्तानी पंतप्रधान मारले गेले असते; डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा
ट्रम्प यांनी कोणत्या मुद्द्यांवर खोटे दावे केले?
1. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या मध्यस्थिने 8 युद्धांना पूर्णविराम दिल्याचा उल्लेख केला आहे. ज्यात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचादेखील समावेश आहे. यावेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांचा हवाला दिला. ट्रम्प युद्ध थांबवल्याचा दावा करत असताना, डेमोक्रॅट्स कडून खोटे, खोटे” अशा घोषणा दिल्या जात होत्या.
2. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात वॉशिंग्टनमधील गुन्हेगारी नष्ट केल्याचाही दावा केला. त्यांनी सांगितले की, राजधानी वॉशिंग्टनमध्ये आता गुन्हेगारी अस्तित्वात नाही. मात्र, ट्रम्प यांचा हा दावा देखील खोटा आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या मते, 2026 मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, वॉशिंग्टनमध्ये किरकोळ गुन्हे निश्चितच कमी झाले आहेत. त्यामुळे, गुन्हेगारी अस्तित्वात नाही हा ट्रम्प यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. Donald Trump Told More Than 20 Lines In 107 Minute Speech
3. 2024 च्या अमेरिकन निवडणुकीत अंड्यांचे भाव हा एक प्रमुख मुद्दा होता. यावर बोलताना ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या निवडीनंतर अंड्यांच्या किमती 60 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कामगार विभागाने याबाबत कोणतेही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की, अमेरिकेत गोमांसाच्या किमती कमी झाल्याचेही ट्रम्प म्हणाले पण, देखील खरे नसून,अमेरिकेत गोमांसाच्या किमती वाढल्या आहेत.
ट्रम्प यांनी 10 टक्के जागतिक टॅरिफ फक्त 150 दिवसांसाठी का लादला? समजून घ्या कायद्याचं गणित
4. भाषणावेळी ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेतील मिसौला येथील सोमाली समुदायाने 19 अब्ज डॉलर्सचा भ्रष्टाचार केला. पण, ट्रम्प यांचा हा दावा देखील खोटा असल्याचे डेमोक्रॅटिक काँग्रेसवुमन इल्हान उमर यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, मिसौलामध्ये फक्त 1 अब्ज डॉलर्सचा भ्रष्टाचार झाल्याची नोंद झाली आहे.
5. ट्रम्प यांनी मागील बायडेन प्रशासनावर हल्ला चढवत म्हटले की, “तुम्ही 1 कोटी लोकांना अमेरिकेत प्रवेश दिला. ते सर्वजण तुरुंगातून किंवा मानसिक आश्रयातून थेट अमेरिकेत दाखल झाले. पण, अद्याप कोणत्याही अमेरिकन एजन्सीने याबद्दल वृत्त दिलेले नाही. एनबीसी न्यूजच्या मते, ट्रम्प यांचा हा दावाही खोटा आहे.
6. “मी एका वर्षात 7,00,000 नोकऱ्या निर्माण केल्याचा दावाही भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. पण, अमेरिकेच्या कामगार विभागाच्या मते, 2025 ते 2026 दरम्यान अमेरिकेत फक्त 44,00 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा हा दावाही खोटा असल्याचे आता समोर आले आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ आणि सामाजिक सुरक्षा उत्पन्न यासारख्या मुद्द्यांवरही भाषणावेळी खोटे दावे केले.
