श्रीलंका, नेपाळ अन् पाकिस्तान चीनच्या सापळ्यात मित्र देश कंगाल; आता ‘हा’ देश चीनच्या रडारवर..

China Bangladesh : नेपाळनंतर आता बांग्लादेश सुद्धा चीनच्या सापळ्यात अडकत चालला आहे. कर्ज आणि आर्थिक सहकार्याच्या जाळ्यात अडकून बांग्लादेश भारताशी संबंध बिघडवत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान प्रमाणेच बांग्लादेशही आर्थिक संकटाचा सामना करू शकतो अशी चिन्हे निर्माण होत आहेत. चीनचे कर्ज धोरण आणि त्याच्या भू राजकीय अजेंड्यापासून बांग्लादेशने सावध राहण्याची गरज आहे पण तसे होताना दिसत नाही. शेख हसीना सरकार गेल्यानंतर बांग्लादेशात अस्थिरता आली आहे. हिंदू अल्पसंख्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. जागतिक पातळीवरही याबाबतीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु सध्याच्या बांग्लादेशातील सरकारला याचे काहीच सोयरसुतक वाटत नाही.
यातच आता बांग्लादेश चीनकडे झुकू लागला आहे. बांग्लादेश सरकारची चीन समर्थक धोरणे आगामी काळात त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात. नेपाळमध्ये चिनी राज्यकर्त्यांनी असाच हस्तक्षेप केला. येथील जनता आता चीनच्या त्रासाने हैराण झाली आहे. देशातील चीनचा प्रभाव संपवावा असे येथील लोकांना वाटत आहे. फक्त नेपाळच नाही तर असे अनेक देश आहेत जे सध्या चीनच्या सापळ्यात अडकले आहेत.
या देशांमध्ये आता राजकीय अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. काही देश तर पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशी परिस्थिती असतानाही बांग्लादेश चीनचा नवा मित्र बनू पाहत आहे. आफ्रिकेतील काही देश तर चीनच्या जाळ्यात अडकून उद्ध्वस्त झाले आहेत. आता बांग्लादेशही त्याच मार्गाने निघाला आहे. यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो की चीन नेमके असे करतो तरी काय की ज्यामुळे देश त्याच्या सापळ्यात अडकतात.
रशियन सैन्यासाठी उत्तर कोरियाचा फॉर्मुला; रशिया 4 महिन्यांत करणार दीड लाख सैन्य भरती..
खरंतर चीनने आपल्या विस्तारवादी स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी एक जाळे तयार केले आहे. या जाळ्यात नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका असे अनेक देश अडकले आहेत. ज्या ज्या देशांनी चीनशी मैत्री केली त्या देशांत आज प्रचंड उलथापालथ सुरू आहे. बांग्लादेशची परिस्थिती जगापासून लपून राहिलेली नाही. तरी देखील या देशाने चीनच्या मैत्रीखातर भारताशी संबंध बिघडवून घेतले आहेत.
चीन बांग्लादेशचे काय करणार
बांग्लादेशने भारताशी आपली मैत्री कायम राखण्याऐवजी चीनला प्राधान्य दिले. श्रीलंका, पाकिस्तान यांची परिस्थिती माहिती असताना देखील बांगलादेशने चीनशी मैत्री करून स्वतः ला संकटात टाकण्याचा मार्ग निवडला आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी नुकताच चीन दौरा केला. यावेळी त्यांनी चीनचे मोठे कौतुक केले होते. पण दुसरीकडे याच चीनने बांग्लादेश विरुद्ध कारवाया करण्यास सुरुवात केली. आता बांग्लादेशची अवस्था देखील पाकिस्तान सारखीच होणार का, बांग्लादेशची आर्थिक परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एका रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की चीनने बांग्लादेशला नवा श्रीलंका बनवण्याची तयारी केली आहे. दोन्ही देशांत आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते.
रिपोर्टनुसार बांग्लादेश आणि चीन यांच्यात नऊ द्विपक्षीय करारावर सह्या करण्यात आल्या. यात आर्थिक आणि तंत्रज्ञान संबंधित करार आहेत. चिनी कंपन्यांनी बांग्लादेशात निर्माण कार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी केले. देशाची औद्योगिक क्षमता वाढवण्याबरोबरच रोजगारात वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. कमी व्याजदरात कर्ज द्यावे अशी मागणी बांग्लादेशने चीनकडे केली आहे. बांग्लादेशने याआधीच चीनकडून साडेसात अब्ज डॉलर्सचे कर्ज घेऊन ठेवले आहे.
आता बांग्लादेशने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी कर्जाची मागणी केली आहे. जाणकारांच्या मते चीन कमकुवत देशांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतो. यानंतर चीन या देशांना आपल्या नियंत्रणात ठेवतो. चीनच्या या कारनाम्याचे परिणाम आफ्रिकी देश आणि श्रीलंकेत दिसले आहेत. चीनने आधी श्रीलंकेला कर्ज चुकते करण्यात मदत करू असे आश्वासन दिले. तेथील राज्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर श्रीलंका चीनच्या जाळ्यात अडकला. याची फार मोठी किंमत या देशाला मोजावी लागली आहे.
मोठी बातमी! बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्य शिबिरांवर तुफान हल्ले; हायवे केले हायजॅक
श्रीलंकेचं सात अब्ज डॉलर्सचे नुकसान
चीनमुळे श्रीलंकेचे सात अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 2022 मध्ये या देशात आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यावेळी 46 अब्ज अमेरिकी डॉलर कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले होते. या काळात श्रीलंकेत भीषण आर्थिक संकट निर्माण झाले होते. महागाई प्रचंड वाढली होती. जनतेच्या प्रचंड विरोधानंतर प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
पाकिस्तान तर आधीच चीनच्या जाळ्यात फसलेला आहे. यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय होत चालली आहे. चीनच्या पाकिस्तानमधील प्रकल्पांवर बलूच बंडखोर हल्ले करत आहेत. यामुळे चीनही हैराण झाला आहे. आता तर पाकिस्तानात अशी चर्चा सुरू झाली आहे की चीन लवकरच बलुचिस्तानात स्वतः चे सैन्य तैनात करण्याच्या तयारीत आहे.