मोठी बातमी! बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्य शिबिरांवर तुफान हल्ले; हायवे केले हायजॅक

मोठी बातमी! बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्य शिबिरांवर तुफान हल्ले; हायवे केले हायजॅक

Pakistan Balochistan Attack : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानातून (Pakistan News) पुन्हा धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील अशांत असणाऱ्या बलुचिस्तानात बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी या बंडखोरांच्या गटाने पाकिस्तानी सैन्याच्या मुख्य शिबिरावर हल्ला केला. ग्वादर, केच आण बोलन या भागात एकाच वेळी हल्ले करण्यात आले. तसेच काही शहरांना जोडणाऱ्या हायवेंवर कब्जा केला. बलुचिस्तान पोस्टमधील रिपोर्टनुसार सशस्त्र बलूच बंडखोरांनी केच जिल्ह्यातील चीन पाकिस्तान इकॉनॉनिक कॉरिडोर राजमार्गवर काही ट्रकवर हल्ला केला. याच दरम्यान त्यांनी चार वाहनांना आग लावून दिली.

रिपोर्टनुसार बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान बंडखोरांनी पाच लोकांची हत्या केली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही या माहितीला दुजोरा दिला. तुर्बत जिल्ह्यातील लोकांनी रात्री उशीरा गोळीबाराचा आवाज ऐकला. काही ठिकाणी स्फोटांचे आवाजही ऐकू येत होते. या आवाजांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. बलूच बंडखोर मोठ्या संख्येने रस्त्यांवर गस्त घालताना दिसून आले. बलुचिस्तानातील मंड भागात सु्द्धा पाकिस्तानी सैन्याच्या शिबिरावर हल्ला करण्यात आला.

भारत अन् बलुचिस्तानला चीनच्या प्रोजेक्टचा धोका; अपहरणकर्त्यांच्या रडारवर होता सीपेक?

बलुचिस्तानातील या हल्ल्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हत्यारबंद बंडखोर क्वेटा-कराची महामार्गावर मस्तंग जवळ तीन वेगवेगळ्या ठिकाणी नाकेबंदी करताना व्हिडिओत दिसत आहेत. काही जणांना मोटारसायकलींवर पाहण्यात आले.

बलुचिस्तानात मोठा तणाव

बलु्चिस्तानात मागील काही वर्षांपासून अत्यंत तणावाची परिस्थिती आहे. बलुचिस्तानातील लोक स्वतःला पाकिस्तानचा भाग मानत नाहीत. पाकिस्तानने जबरदस्तीने बलुचिस्तान ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी सैन्याकडून बलूच नागरिकांवर अत्याचार होत असल्याच्या घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बलूच बंडखोरांनी तर अख्खी रेल्वेच हायजॅक केली होती. यातील पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांना ठार मारण्यात आले होते. या घटनेनंतर जगभराचे लक्ष बलुचिस्तानवर केंद्रीत झाले आहे. बलुचिस्तानातील सशस्त्र अलगाववादी गट पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा दलांच्या विरोधात मोठे ऑपरेशन चालवत आहेत.

पाकिस्तान पुन्हा हादरला! ट्रेन अपहरणानंतर सैन्य ठिकाणांवर आत्मघाती हल्ला; अनेकांचा मृत्यू

follow us
  • fb
  • instagram
  • youtube