live now
Maharashtra Budget : शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी पण, लाडक्या बहिणींचा हिरमोड…
Maharashtra Budget मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत...
Maharashtra Budget Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.6) महाराष्ट्राचा 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे करोडो बहिणींची हिरमोड झाला आहे. अर्थसंकल्पात कोण-कोणत्या घोषणा झाल्या त्याचा पॉईंट टू पॉईंट अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग….
LIVE NEWS & UPDATES
-
लाडकी बहिण योजनेसंदर्भात अर्थसंकल्पातून मोठी घोषणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, 1500 ऐवजी 2100 रूपये देण्याची घोषणा फडणवीसांकडून करण्यात आलेली नाही. एकल महिलांच्या कल्याणसाठी लवकरच धोरण आणण्यात येईल. २५ लाख दीदींना लखपती करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले.
-
शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, अर्थसंकल्पातून सर्वात मोठी घोषणा
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठित केली आहे. पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी योजना मी जाहीर करत आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्यांना लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार
-
महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद
महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद. मागेल त्याला सौर कृषीपंप योजने अंतर्गत 6 लाखाहून अधिक पंप
-
राज्याचे नवे गुंतवणूक आणि सेवा धोरण जाहीर
- परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र वन
- प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र
- उद्योजकता वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेवाक्षेत्र आयुक्तालय
- गडचिरोली जिल्हा 70 हजारोंना अधिक रोजगार
- गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार
- रोजगार निर्मितीसाठी जागतिक क्षमता केंद्र
- स्टार्टअप प्रोत्साहन करण्यासाठी विशेष योजना
- मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू
- जागतिक क्षमता केंद्राची सर्वाधिक पसंती पुण्याला
- मुंबई दुबई सिंगापूर मध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार
- वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे
- तिसरी चित्रनगरी नागपूर जिल्ह्यात रामटेक मध्ये
- पाच ज्योतिर्लिंगांचा विकास आराखड्यासाठी तरतूद
- महानुभाव पंथाच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा विकास
- 10 हुन सक्षम विकास प्राधिकरण स्थापन करणार
- अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार
- 2030 पर्यंत एम एम आर ची अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलरपर्यंत नेणार
- एम एम आर मध्ये बेकायदा झोपडपट्ट्यांना आळा घालण्याचे नव धोरण
- मुंबई दुसरी भूमिगत मेट्रो सुरू करणार
-
- मुंबई पुणे नागपूर मध्ये 490 किमी मेट्रो मार्ग
-
२०४७ पर्यंत राज्यातील पर्यटकांची संख्या ३८ कोटींवर नेणार
२०४७ पर्यंत राज्यातील पर्यटकांची संख्या ३८ कोटीपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. मुंबई, दुबई, सिंगापूर येथे पर्यटन गुंतवणूक कक्ष उभारले जातील. निवडक ५० पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी दिला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
राज्यात तिसरी चित्रनगरी स्थापन करणार
राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगा तालुका रामटेक येथे विकसित करण्यात येणार आहे. नवीन पिढीला महाकवी कालिदासांचा जीवनपट कळावा म्हणून चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.
-
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भूयारी मार्ग उभारणार
रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई, पुण्यात भूयारी मार्ग उभारले जाईल. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी छेडा नगर ते साकेत नगर उन्नत मार्ग तयार केला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
चौथ्या मुंबईसाठी पायाभूत सुविधा
मुंबई व पुण्याला ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे.४ लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे. मुख्यमंत्री राज्याच्या अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची घोषणा केली असून, अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई वाढवण परिसरात उभारणार आहे. तर एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार आहे. नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
-
इन्व्हेस्ट महाराष्ट्राचा नारा
राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक सेवा धोरण जाहीर केलं आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. या धोरणातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच यासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील.१२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे.महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.
