Bihar : मतदार यांद्यामध्ये मोठा घोळ, व्होटर लिस्टमध्ये नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारच्या नागरिकांची नावे

Bihar voter list : बिहारमध्ये (Bihar) या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India – ECI) मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) केले जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकीसाठी केलेल्या मतदार याद्यांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांतील नागरिकांची नावेही या याद्यांमध्ये आढळून आल्याची माहिती आहे. त्यामुळेच सध्या बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, वाचा काय अन् कसं घडलं?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदार याद्यांसाठी सर्वेक्षण (Special Intensive Revision – SIR) सुरू आहे. सर्वेक्षणादरम्यान, बूथ लेव्हल ऑफिसर्सना (बीएलओ) या यादींमध्ये भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारच्या काही नागरिकांची नावे मतदार याद्यांमध्ये आढळली आहेत. यापैकी काही व्यक्तींकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि राशन कार्डसारखी कागदपत्रेही आढळली आहेत. या परदेशी नागरिकांपैकी बहुतेकांनी ही कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने मिळवली असून अशा लोकांची संख्या लाखोंमध्ये असल्याचे सांगितले जाते.
भाविकांनो लक्ष द्या! तुळजाभवानी मंदिर आता फक्त 19 तास खुलं, वेळेची मर्यादा…
दरम्यान, बोगल मतदान घडवून आणण्यासाठी सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये नावे वाढवली असल्याचे बोलले जात आहे.
बनावट मतदारांची नावे यादीतून वगळणार
आयोगाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा सर्व लोकांची यादी तयार केली जात आहे. या लोकांची चौकशी करण्यासाठी आयोगाने ०१ ते ३० ऑगस्ट दरम्यान एक विशेष मोहीम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. जर अशा लोकांचे कागदपत्र चुकीचे आढळले तर त्यांची नावे ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून काढून टाकली जातील.
८० टक्के सर्वेक्षण पूर्ण
आतापर्यंत सर्वेक्षणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. पडताळणीबाबत जारी केलेल्या सूचनांनुसार, २००३ नंतर मतदार यादीत ज्यांची नावे समाविष्ट झाली आहेत, अशा सर्व मतदारांना ३० ऑगस्टपर्यंत त्यांचे कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.
दरम्यान, काही परदेशी नागरिकांकडे आधार कार्ड, राशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळल्यने निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.