Video : COEP चे माजी विद्यार्थी अन् पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिकाचा बिहारमध्ये ‘सायबर मर्डर’

शिंदे हे पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (COEP) माजी विद्यार्थी असून, त्यांची खेड शिवापूर येथे मोठी कंपनी आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2025 04 15T162934.057

पुणे : पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, लक्ष्मण साधू शिंदे (वय 55 रा. कोथरूड पुणे) असे बिहारमध्ये अपहरण (Kidnaping) करून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिंदे हे पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (COEP) माजी विद्यार्थी असून, त्यांची खेड शिवापूर येथे मोठी कंपनी आहे. नेमका घटनाक्रम काय घडला शिंदे पाटण्यात कसे गेले या सर्वाबाबत संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे. बिहारच्या स्पेशल टीमने या प्रकरणी ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Pune’s Businessman Killed In Bihar Patana City )

नवऱ्याचा अघोरी प्रताप! बायकोच्या गुप्तांगात हळदी-कुंकू भरत लिंबू पिळलं, पुण्यात धक्कादायक घडलं

नेमकं काय घडलं?

घडलेल्या घटनेबाबत माहिती देताना संभाजी कदम यांनी सांगितले की, लक्ष्मण साधू शिंदे यांचा खेडशिवापूर येथे व्यावसाय असून, सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामासाठी मेल करत त्यांना पाटण्यात बोलून घेतले आणि त्यांची हत्या केली. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा मेल आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना पाठवला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी शिंदे बिहारला गेले होते.

पाटणा एअरपोर्टवर आरोपींनी केले शिंदेंचे स्वागत

पाटण्यात जाण्यापूर्वी शिंदे यांनी पाटण्याला जाण्यापूर्वी आरोपींना ते ज्या विमानाने प्रवास करणार आहेत त्याचे तिकीट पाठवले होते. त्याप्रमाणे संबंधित आरोपी पाटणा विमानतळावर शिंदे यांना घेण्यासाठी आले होते. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांना त्यांनी आणलेल्या गाडीत बसवून त्यांचे अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर त्यांना एका शेतात नेऊन पैशांची मागणी करण्यात आली. मात्र उद्योगपती शिंदे यांनी पैसे दिले नाही, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.

Pune Crime: पुणे हादरले! प्रियकराच्या मदतीने आईनेच लेकीचे अश्लील व्हिडिओ काढून केले व्हायरल

पाटण्यात गेल्यानंतर शिंदेंचा फोन बंद

लक्ष्मण साधू शिंदे हे पाटण्यात पोहोचल्यानंतर त्यांचं पत्नीशी शेवटचे बोलण झालं होतं. शिवराज सागी या व्यक्तीने पाठवलेली कार आपल्याला झारखंडला घेऊन जात असल्याचे शिंदे यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले होते. पण त्यानंतर शिंदे यांचा फोन सातत्याने बंद येत होता. त्यामुळे शिंदे यांचे कुटुंबिय चिंतेत होते. अखेर शिंदे यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्यानंतर काल (दि.14) रोजी पाटण्यात बिहारमधील जहानाबाद येथे शिंदे यांचा मृतदेह सापडला. शिंदे यांची हत्या १२ एप्रिल रोजी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

follow us