अपहरणानंतर मारहाणीच्या सुचना देणारा ‘तो’ फोन कॉल कुणाचा? सुदर्शन घुलेच्या जबाबात धक्कादायक खुलासा

Santosh Deshmukh Kidnap and instructions to beat Shocking revelation in Sudarshan Ghule’s statement : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणामध्ये सातत्याने नवनवीन ट्विस्ट आणि नवीन नावं समोर येत आहेत. आता या हत्याकांडामध्ये सुदर्शन घुले ने दिलेल्या कबुलीमध्ये खळबळजनक खुलासा त्यांनी (Santosh Deshmukh) केला आहे. त्यामध्ये संतोष देशमुखांचं अपहरण केलं त्यानंतर जो त्यांना मारहाण करण्याच्या सुचना देणारा कॉल आला होता. तो फोन कॉल कुणाचा होता त्याचा खुलासा झाला आहे.
ब्रेकिंग! भाषण करतानाचा मनोज जरांगे पाटील कोसळले, स्टेजवरच प्रकृती खालावली
या जाबाबात सुदर्शन घुलेने या चार पानांच्या जबाबांमध्ये म्हटला आहे की, देशमुख यांचं अपहरण ते हत्या या सर्व घटना क्रमात विष्णू चाटे यांच्या संपर्कात होता. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागणी तसेच मारेकऱ्यांमध्ये चाटे हाच मध्यस्थ होता. तसेच ज्यावेळी देशमुख यांचा अपहरण झालं. त्यानंतर त्यांना मारण्याच्या सूचना देणारा एक फोन कॉल तिथे आला होता. हा फोन कॉल विष्णू चाटेचा होता त्याने देशमुख यांना ज्या प्रकारे करण्यात आली. त्या सर्व सूचना दिल्या होत्या. तसेच त्यांना काळजाचा थरकाप पडलेला भयावह मारहाण केल्यानंतर मारेकऱ्यांनी पुन्हा देशमुख यांना त्यांच्या कपडे घालून मृतदेह आज्ञास्थळी टाकून निघून गेल्याचे याचाबाबत सांगितलेला आहे.
भूकंपाने म्यानमारमध्ये हाहाकार माजवला… आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी
आता या हत्याकांडामध्ये आणखी एका कराडची एन्ट्री झालीय. या कराडचं नाव सुग्रीव कराड (Santosh Deshmukh) आहे. जयराम चाटे आणि महेश केदारने दिलेल्या कबुलीमध्ये खळबळजनक खुलासा त्यांनी (Santosh Deshmukh) केला आहे. हत्याप्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू झालीय. दोन दिवसांपूर्वी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये बीड न्यायालयात सुनावणी झाली.
कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप; श्रेयस तळपदेनं मौन सोडलं, ‘अहवाल पूर्णपणे खोटे अन् निराधार… ‘
यावेळी हत्या प्रकरणाची बाजू मांडताना आरोपींच्या कृत्याचा कित्ताच गिरवलाय. खंडणीसाठी ही हत्या करण्यात आली, असं सीआयडीच्या तपासात निष्पन्न झालंय. तर आरोपींनी देखील याची कबुली दिली आहे. सध्या या प्रकरणातील (Chate And Mahesh Kedar Confession) आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेतोय. या प्रकरणी आता सुग्रीव कराडची एन्ट्री झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख अन् मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावूनच सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं सांगितलं. याच पूर्ववैमनस्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या केली, अशी कबुली आरोपी चाटे आणि केदार यांनी दिलीय.