Video : फडणवीसांचा राष्ट्रवादीशी ‘ब्रेकअप’; धक्का बसलेल्या दादांनी पलटवाराऐवजी बाजू सावरली

Ajit Pawar यांनी देखील फडणवीसांनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी हे विरूद्ध लढणार असल्याचंच म्हटलं आहे.

Pune PMC

Ajit Pawar on Devendra Fadanvis Statement about Alliance in PMC and PCMC : राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक(Managarpalika Election) होणार असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपलिकेसाठीचं राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर लढणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना जे योग्य वाटत ते स्टेटमेंट त्यांनी केलं आहे. त्यांनी माध्यमांना काय सांगितलं ते मला माहिती नाही. तसेच त्यांनी ते विधान चर्चेनंतरच केलं असेल. अनेकदा आम्ही चर्चा करून रणनीती ठरवतो. त्यामुळे निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी जे म्हटल ते फायनल असेल. असं म्हणत अजित पवार यांनी देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपामध्ये भाजप राष्ट्रवादी हे विरूद्ध लढणार असल्याचंच म्हटलं आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही. लढत झाली तरी मैत्रीपूर्ण असेल. असं सांगत संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे आता भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने येणार आहेत. असं फडणवीसांनी सोमवारीच स्पष्ट केलं आहे.

IND vs SA: अक्षर पटेल मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला दोन वर्षांनंतर भारतीय संघात पुन्हा संधी

तर ठाकरे बंधुंच्या युतीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, कोणी एकत्रित आले तरी जनतेच्या मनात असते,कोणाला.मतदान करायचे नाही करायचे, विरोधकांच्या बाजूला गेला तर ईव्हीएम चांगला, अन् त्याच्या विरोधात गेला की ईव्हीएम मशीनला दोष देतात, मलाही अनेक तक्रारी आपल्या, याद्या पारदर्शक झाल्या पाहिजेत. लोकशाहीमध्ये कोणाला निवडून द्यावे हे जनतेला अधिकार आहे. राजकीय पक्ष इलेक्ट्रिक मेरिट पाहून तिकीट देतात.

 

follow us