LPG Crises : इंडक्शन शेगडीची ABCD; गॅस टंचाईत उपयोगी विज्ञान, फायदा अन् एक भारी जुगाड!

How Induction Gas Work कोणतीही आग किंवा इंधन नसताना इंडक्शनवर जेवण शिजते कसे? आणि यासाठी विशिष्ट भांडीच का लागतात?

  • Written By: Published:
LPG Crises : गॅस टंचाईवर उपाय; इंडक्शन शेगडीची ABCD; विज्ञान, फायदा अन् एक भारी जुगाड!

War, Induction & LPG Crises :  मित्रांनो, गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे सध्या सगळीकडे इंडक्शनचा ‘विषय’ जोरात सुरू आहे ना? पण कधी विचार केलाय का? इंडक्शन शेगडीवर ना आग दिसते, ना गॅसचा वास येतो, तरीही त्यावरचा चहा मिनिटात कसा उकळतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या शेगडीवर हात लावला तर, चटका बसत नाही, पण पातेलं ठेवलं की, ते लगेच गरम कसं होतं? चला, आज यामागचं ‘सायन्स’ अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया…

युद्ध आखातात अन् गॅस टंचाई भारतात; सर्वसामान्यांच्या घरात पहिल्यांदा कसा अन् कधी पोहचला LPG

इलेक्ट्रोमॅग्नेटिकची जादू

इंडक्शन शेगडी ही ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड’ (Electromagnetic Field) या तंत्रज्ञानावर काम करते. या शेगडीच्या काचेच्या खाली तांब्याची (Copper) एक कॉईल असते. जसं आपण बटन चालू करतो, तसं या कॉईलमधून वीज वाहते आणि एक चुंबकीय शक्ती तयार होते.

यासाठी खास भांडीच का लागतात?

आता तुम्ही म्हणाल, यावर पदार्थ बनवण्यासाठी कोणतंही भांडं चालेल का? तर याच उत्तर नाही असे आहे. इंडक्शनवर स्वयंपाक बनवण्यासाठी लोखंड किंवा स्टीलची (Ferromagnetic) भांडीच लागतात. जेव्हा आपण असं भांडं शेगडीवर ठेवतो, तेव्हा ती चुंबकीय शक्ती भांड्याच्या तळाशी घर्षण निर्माण करते. याच घर्षणामुळे भांडं गरम होतं आणि त्यातील जेवण शिजतं.

LPG टंचाईवर जालीम उपाय! गॅसशिवाय 5 मिनिटांत बनणारे पोटभरीचे ‘फायरलेस’ फूड…

सुरक्षित आणि फायदेशीर

इंडक्श शेगडीचा आणि त्यातील तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, यात फक्त भांडं गरम होतं, शेगडी नाही. त्यामुळे चटका बसण्याची भीती कमी असते. दुसरं म्हणजे, गॅसच्या तुलनेत यात उष्णता वाया जात नाही, त्यामुळे जेवणही पटकन तयार होतं.

भांडं नसेल तर, कामी येईल जुगाड

समजा तुमच्याकडे इंडक्शनचं भांडं नसेल तर? तर एक भारी जुगाड आहे. इंडक्शनवर लोखंडाची जाळी ठेवा. ती जाळी गरम होईल आणि त्या उष्णतेवर तुम्ही साधं भांडं ठेवूनही काम करू शकता. फक्त असे करताना  सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचं आहे कारण, जाळी खूप गरम होते, त्यामुळे हात लावताना जपून लावा नाही तर, चटका बसलाच म्हणून समजा.

follow us