IND vs SA: अक्षर पटेल मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला दोन वर्षांनंतर भारतीय संघात पुन्हा संधी

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात बदल

  • Written By: Published:
IND Vs SA

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहे. स्टार खेळाडू अक्षर पटेल या मालिकेतून बाहेर पडला आहे. आजारपणामुळे तो या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांना मुकणार आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू शहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे. शहबाज अहमदने भारतासाठी 2023 च्या आशियाई स्पर्धेत शेवटा टी20 सामना खेळला होता.

आजारपणामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) उर्वरित दोन टी20 सामन्यांमधून अक्षर पटेलला वगळण्यात आले असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. तसेच अक्षरच्या (Axar Patel) जागी भारतीय संघात 17 आणि 19 डिसेंबर रोजी लखनौ आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या शेवटच्या दोन टी20 सामन्यांसाठी शाहबाज अहमदची (Shahbaz Ahmed) निवड करण्यात आली असल्याची माहिती देखील बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

शाहबाज अहमद कोण आहे?

31 वर्षीय शाहबाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन विकेट्स आणि दोन टी20 सामन्यांमध्ये दोन विकेट्स घेतल्या. त्याने आतापर्यंत 114 टी20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 73 विकेट्स घेतल्या आहेत आणि एका शतकासह 1,355 धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे.

तर दुसरीकडे पहिल्या दोन टी20  सामन्यांमध्ये अक्षर पटेलने तीन विकेट घेतल्या होत्या आणि पहिल्या सामन्यात 21 तर दुसऱ्या सामन्यात 23 धावा केल्या होत्या. कटमध्ये झालेल्या सामन्यात त्याने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महाविकास आघाडीतील एक पक्ष MIM सोबत युतीसाठी तयार, इम्तियाज जलील यांचा दावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी20 सामन्यांसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद.

follow us