टीम इंडियाचं तुफान वादळ! दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20I सामन्यात मिळवला एकतर्फी विजय
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 176 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेत टीम इंडियाने दणदणीत सुरुवात केली आहे. (India) टीम इंडियाने कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20I सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला. हार्दिक पंड्या याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 12.3 ओव्हरमध्ये 74 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह पहिलाच सामना हा 101 धावांचा मोठ्या फरकाने जिंकला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
स्मृती मानधनाकडे BCCIने दिली मोठी जबाबदारी, टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 176 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अर्शदीप सिंह याने क्विंटन डी कॉक याला भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं धावांआधी विकेटचं खातं उघडलं. इथून भारताने दक्षिण आफ्रिकेला झटपट पटापट झटके दिले.
टीम इंडियाला टॉस गमावल्याने बॅटिंग करावी लागली. टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी भारताला सावरलं. तिलक वर्मा, अक्षर पटेल, जितेश शर्मा आणि शिवम दुबे या चौघांनी निर्णायक योगदान दिलं. तर हार्दिकने चाबूक अर्धशतकी खेळी साकारली.
