बाजार ‘रॉकेट’ होईल या भ्रमात राहू नका! पुढचे ६ महिने अत्यंत कठीण; इन्वेस्टर्सने आता काय करावं?

War & Share Market Investment : शेअर बाजार कोसळताना पाहून घाबरून जाण्यापेक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाऊल उचलणे कधीही फायदेशीर ठरते.

  • Written By: Published:
बाजार 'रॉकेट' होईल या भ्रमात राहू नका! पुढचे ६ महिने अत्यंत कठीण; इन्व्हेसटर्सने आता काय करावं?

War & Share Market Investment :  : पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीय शेअर बाजारात सध्या मोठे चढउतार पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्या कष्टाचा पैसा सुरक्षित कसा ठेवायचा? आता रिटर्न मागे धावायचं की रिस्क मॅनेज करायची? तज्ज्ञांचा नेमका ‘मंत्र’ काय आहे, जाणून घेऊया…

शेअर मार्केटमध्ये 1929 सारखा हाहाकार उडणार; रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाची थरकाप उडवणारी पोस्ट

‘वेट अँड वॉच’ मोड

सध्या परिस्थिती खूप वेगाने बदलत आहे. नक्की काय होईल, याचा अंदाज वर्तवणं कठीण आहे. त्यामुळे आता ‘अंधाधुंद’ गुंतवणूक करण्यापेक्षा ‘रुको आणि देखो’ (Wait and Watch) हीच सर्वात मोठी स्ट्रॅटेजी आहे. सध्या धाडसी निर्णय घेण्यापेक्षा आपल्या पोर्टफोलिओला सुरक्षित ठेवण्यावर भर द्या असा सल्ला व्हेंचुरा सिक्युरिटीजचे डायरेक्टर गाबाजीवाला यांनी गुंतणुकदारांना दिला आहे.

लम्पसम गुंतवणूक करावी का?

शेअर बाजार पडलाय तर, लगेच मोठी रक्कम म्हणजेच ‘लम्पसम’ गुंतवणूक करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो पण, जरा थांबा. कारण युद्ध किती दिवस चालेल आणि कच्च्या तेलाचे दर कुठपर्यंत जातील, याचा काहीही नेम नाही. त्यामुळे तुमचा ‘हार्ड अर्न मनी’ एकाच वेळी अडकवण्याची घाई करू नका. असा सल्ला फायनान्शिअल प्लॅनर्स देत आहेत.

ट्रम्प यांनी इराणला 14 दिवसांचा वेळ का दिला? टैको प्लॅनचं सिक्रेट नेमकं काय?

किती दिवस राहणार अशीच परिस्थिती?

आता तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की, ही परिस्थिती अशीच किती दिवस राहणार? तर, याबाबत ‘प्लॅन अहेड वेल्थ अडवाइजर्स’चे विशाल धवन यांच्या मते, इतिहास सांगतो की, अशा जिओपॉलिटिकल तणावाचा परिणाम बाजारातून पूर्णपणे निघून जाण्यासाठी 1 ते 6 महिन्यांचा काळ लागू शकतो. त्यामुळे मार्केट लगेच ‘रॉकेट’ होईल या भ्रमात राहू नका.

गुंतवलेला पैसा काढावा का?

युद्धजन्य परिस्थिती आणि बाजारातील चढ-उतार बघता शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा काढावा का? आणि कुणी काढावा तर, ज्यांना येत्या 6 महिन्यात घरखर्च, शिक्षण किंवा लग्नासाठी पैशांची गरज आहे, त्यांनी सध्या बाजारातून ‘एक्झिट’ घेतलेलीच बरी पण, ज्यांच्याकडे वर्षभराचा वेळ आहे, त्यांनी थोडा संयम ठेवावा असा महत्त्वाचा सल्ला धवन यांनी दिला आहे.

लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!

शेअर बाजारातील नव्याने एन्ट्रीसाठी योग्यवेळ?

दुसरीकडे, Fisdom चे नीरव करकेरा या घसरणीला एक संधी मानतात. पण ते काय म्हणतात? तर, पुढच्या तीन महिन्यात हळूहळू ‘लार्ज-कॅप’ फंड्समध्ये गुंतवणूक वाढवा. ही वेळ पोर्टफोलिओ री-बॅलेन्स करण्याची आहे. त्यामुळे सध्या जोखीम कमी असलेल्या कंपन्यांना प्राधान्य द्या असा सल्ला करकेरा यांनी गुंतवणुकदांना दिला आहे.

follow us