तिलक – अभिषेक पैकी एक होणार बाहेर? उपांत्य फेरीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या

IND vs ENG : आयसीसी टी20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर

IND Vs ENG

IND vs ENG : आयसीसी टी20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनने शानदार कामगिरी केल्यानंतर सेमी फायनल सामन्यात भारतीय संघात काही बदल होणार का? याबाबत देखील अनेक चर्चांना उधाण आले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) फ्लॉप ठरल्याने त्याच्या जागी भारतीय संघात रिंकू सिंगला संधी मिळणार असं सांगितले जात आहे. मुंबईत होणारा हा सामना हाय स्कोअरिंग होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय संघात आज कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

आयसीसी टी20 विश्वचषकामध्ये (ICC T20 World Cup 2026) भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Semi final Match Playing 11) सलग तिसऱ्यांदा एकमेकांविरोधात सेमी फायनल सामना खेळणार आहे. 2022, 2024 आणि आता 2026 विश्वचषकामध्ये दोन्ही संघ एकमेकांविरोधात सेमी फायनल सामन्यात खेळणार आहे. आज जिंकणारा संघ न्युझीलंडविरुद्ध 8 मार्च रोजी फायनल खेळणार आहे.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का?

या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. याचा मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरोधात केलेली शानदार कामगिरी. या सामन्यात देखील संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करु शकतात. तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशन फलंदाजी करु शकतो. तर गोलंदाजी क्रमवारीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

… तर जगभरातील इस्रायली दूतावासांना उडवून देणार; इराणने लेबनॉन मिशनवरुन दिली धमकी

इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

फिल साल्ट, जोस बटलर, टॉम बँटन, हॅरी ब्रुक (कर्णधार), विल जॅक्स, सॅम करन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, लियाम डॉसन, ल्यूक वूड.

follow us