झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासाठी तीन खेळाडू करणार पदार्पण? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन
IND vs ZIM : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार असून या मालिकेचा पहिला सामना आज हरारे स्पोर्ट्स
IND vs ZIM : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार असून या मालिकेचा पहिला सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबर खेळवला जाणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्याने या मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ पहिल्या टी20 सामन्यासाठी तीन खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देऊ शकतो.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या सामन्यात भारतीय संघासाठी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) डावाची सुरुवात करणार आहे. मात्र भारताकडे प्रभसिमरन सिंगचा देखील एक पर्याय उपलब्ध असल्याने त्याच्या नावावर देखील विचार होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पहिल्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघाचा टॉप ऑर्डर जवळपास फिक्स आहे. सलामीवीर अभिषेक आणि वैभव यांच्यानंतर, यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर, कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) चौथ्या क्रमांकावर आणि उपकर्णधार तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतील.
रिंकू सिंगचे पुनरागमन?
तर दुसरीकडे या मालिकेसाठी रिंकू सिंगचे संघात पुनरागमन झाल्याने त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. रिंकू या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे त्यामुळे सूर्यांश शेडगेला कदाचित ‘बेंच’वर बसावे लागेल.
तीन खेळाडूंचे पदार्पण होऊ शकते
पहिल्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात तीन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.यामध्ये अशोक शर्मा, हर्ष दुबे, आणि यश ठाकूर यांचा समावेश आहे. तसेच मयंक यादव आणि रवी बिश्नोई यांनाही ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या T20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, अशोक शर्मा/मयंक यादव, यश ठाकूर, प्रिन्स यादव.
विद्यार्थी आंदोलनामुळे भाजप अॅक्शन मोडमध्ये, रणनीतीही ठरली; आता संपूर्ण देशात…
झिम्बाब्वे टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उप-कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक शर्मा, प्रिन्स यादव