सूर्यकुमारचा विक्रम मोडला! इशान किशनच्या टी-20 मध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा
Ishan Kishan: सूर्यकुमारने 2022 मध्ये भारताकडून 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 1,164 धावा केल्या होत्या. इशानने 1,165 धावांचा टप्पा ओलांडत हा विक्रम मोडला.
Ishan Kishan : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पाचव्या टी-20 सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan) धुव्वाधार खेळी करत अर्धशतक झळकविले. त्याने अवघ्या 32 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 61 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान ईशानने अनेक विक्रम आपल्या नावावर कोरले आहेत. विशेष म्हणजे, त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे. तसेच एका वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या तो भारतीय खेळाडू ठरला आहे.
घरात पत्नी-मुलं असतानाही संजय गुप्ता यांच्यासोबत घडलं काय?, स्वयंपाकघरातील अपघाताचा तपशील समोर
सूर्यकुमारचा विक्रम मोडण्यासाठी इशानला केवळ सहा धावांची गरज होती. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर इशानने आपल्या खेळीतील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत विक्रमाला गवसणी घातली. सूर्यकुमारने 2022 मध्ये भारताकडून 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 1,164 धावा केल्या होत्या. मात्र, इशानने 2026 मध्ये 37 टी-20 सामन्यांत 1,165 धावांचा टप्पा ओलांडत हा विक्रम मोडला.
अभिषेक शर्मालाही विक्रमाची संधी, मात्र…
या सामन्यात भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मालाही सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र, त्याला केवळ दोन चेंडूंत एक धाव करता आली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने याने डावाच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अभिषेकला बाद केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचा झेल डॅरिल मिचेलने पकडला. अभिषेक शर्माने 2026 मध्ये 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1,153 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर या वर्षात दोन शतके आणि आठ अर्धशतके आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात वेगवान टी-20 आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रमही अभिषेकच्या नावावर आहे.
दिल्लीत इंडिया आघाडीची ‘वोट बचाव, देश बचाव’ महारॅली; राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा मोर्चा
2026 मध्ये भारताकडून सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इशान किशन आणि अभिषेक शर्मानंतर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. संजूने 30 सामन्यांत 810 धावा केल्या आहेत. त्याने 2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारही पटकावला होता.
जागतिक विक्रम कोणाच्या नावावर?
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा जागतिक विक्रम मात्र ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंगच्या नावावर आहे. त्याने 2025 मध्ये ऑस्ट्रियाकडून 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना तब्बल 1,488 धावा केल्या होत्या. या यादीत पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानने 2021 मध्ये पाकिस्तानकडून 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1,326 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे इशान किशनने भारतीय फलंदाजांमध्ये एका वर्षात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला असून, त्याच्या या कामगिरीची क्रिकेटविश्वात चर्चा होत आहे.