Student Protest : विद्यार्थी आंदोलनामुळे भाजप अॅक्शन मोडमध्ये, रणनीतीही ठरली; आता संपूर्ण देशात…
Student Protest : नीट पेपर फुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर
Student Protest : नीट पेपर फुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून हजारो विद्यार्थी जमले आहे. या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला होता मात्र या मोर्च्या दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने विरोधक मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहरे काँग्रेस खासदारांसह आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली आहे. विद्यार्थी आंदोलनाचे आणि राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोदी सरकारवर चारही बाजूने टीका होत आहे. तर आता या प्रकरणात भाजप मुख्यालयात देखील बैठक झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
दिव्य मराठीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात 22 जुलै रोजी दिल्लीतील भाजप (BJP) मुख्यालयाच्या 5 व्या मजल्यावर भाजपच्या आठही महामंत्री दरम्यान बैठक झाली. या बैठकीत कॉक्रोज जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वातावरणावर चर्चा झाल्याची माहिती दिव्य मराठीने दिली आहे.
या माहितीनुसार, पहिल्यांदाच भाजप कार्यालयात या मुद्द्यावर बैठक झाली. 3 तास चाललेल्या या बैठकीत आंदोलनाचा परिणाम संपवण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली. प्रत्यक्ष आणि व्हर्चुअल या दोन्ही ठिकाणी प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) देखील राजीनामा देणार नाही हेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
तर काँग्रेसच्या (Congress) पंतप्रधान निवासस्थानावरील धरणे आंदोलनाची माहिती मिळाली नाही आणि जंतर मंतरवरील गर्दीचा अंदाज लागला नाही या दोन चुकाही मान्य केले. तर दुसरीकडे या बैठकीत देशभरातील कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला की, विचारमंथन करा, राहुल गांधी आणि आंदोलनविरोधात मजबूत घोषणा तयार करा. तसेच काँग्रेसने पंतप्रधान निवसास्थानाबाहेर धरणे दिले हे संविधानाचे उल्लंघन आहे. आता काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते धरणे देतील आणि आंदोलन करतील असं देखीय या बैठकीत ठरवण्यात आले आहे. याचबरोबर महिला, किसान मोर्चा यांसारखे विविध विभाग रॅली काढतील आणि आंदोलन करतील असं देखील ठरवण्यात आले आहे.
भारतात चांदीची आयात ठप्प, परवान्याबाबतच्या नवीन नियमांमुळे तुटवडा; किमती वाढणार –
तर या प्रकरणात संघाशी संबंधित बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद सारख्या आंदोलनाच्या तयारीत आहे. संघ या प्रकरणात आतापर्यंत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत भूमिक स्पष्ट करत राजीनामा घेतला जाऊ नये असं सांगण्यात आले आहे. याचा कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान शिक्षण व्यवस्थेत संघा चा सल्ला सर्वोच्च आहेत.