भाषणात धनंजय महाडिकांची ‘स्लीप ऑफ टंग’; पक्षाचा अन् मुलाच्या पदाचा पडला विसर!
Dhananjay Mahadik’s Slip of Tong मुलगा कृष्णराज महाडिक यांच्या भाजपमधील पदाऐवजी घेतले दुसऱ्याच पक्षाचे नाव. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
Dhananjay Mahadik’s Slip of Tong : भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraj mahadik) हे मनसे विरुद्ध आंदोलन केल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. अशातच कृष्णराज महाडिक यांचे वडील राज्य सभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित युवाशक्ति दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात एक चूक केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर चूक लक्षात येताच तो व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्यात आला.
काय बोलले धनंजय महाडिक ?
“कृष्णराज महाडिक यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी जबाबदारी टाकली आहे, मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचे मनापासून आभार. फडणवीसांचे त्याच्यावर किती प्रेम आहे बघा, त्यांनी त्याला थेट ‘काँग्रेस युवक अध्यक्ष’ बनवलं.” असे धनंजय महाडिक बोलले.
पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार; तरुणाईचा जनसागर उसळला
धनंजय महाडिकांनी बोलण्याच्या ओघामध्ये भाजप ऐवजी काँग्रेस असा उल्लेख केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस भाजप नेत्याला काँग्रेस युवक अध्यक्ष कसे काय बनवतील?, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवाय धनंजय महाडिकांना आपल्या मुलाच्या पदाचा आणि पक्षाचा विसर पडला की काय? अशी कुजबूजही होत आहे.
धनंजय महाडीक व्यासपिठावर बोलत असताना त्यांची ही चूक कोणी लक्षात आणून दिली नाही. त्यानंतर ‘भाजप ऐवजी काँग्रेस’ ही चूक लक्षात आल्यावर त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्यात आला.