पुण्यात विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ मोर्चा; विद्यानंद बापट सहभागी होण्याची शक्यता?
Vidyanand Bapat विद्यानंद बापटाच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे बापट हे स्वतः मोर्चात सहभागी होतील की नाही?
Pune March in Support of Vidyanand Bapat Over DJ Ban :पुण्यात डीजे बंदीसाठी आवाज उठवलेल्या विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ आज पुण्यात मोर्चा काढण्यात आलेला आहे. विद्यानंद बापटही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर डीजेबंदीच्या मागणीमुळे त्यांना या अगोदर एका तरुणाकडून मारहाणही करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आज पर्यावरण प्रेमी आणि डीजेबंदीवर ठाम असलेल्या पुणेकरांनी त्यांच्या समर्थनार्थ बालगंधर्व रंग मंदिर चौक ते पुणे महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. मात्र विद्यानंद बापटाच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे बापट हे स्वतः मोर्चात सहभागी होतील की नाही याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…