‘भविष्यात मी राजकारणात येऊ शकतो’; असीम सरोदेंच्या सवालावर विद्यानंद बापटांचं उत्तर

Vidyanand Bapat Political Entry: सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

Vidyanand Bapat Political Entry

Vidyanand Bapat Political Entry: सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत बापट यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का, असा सवाल केला होता. या पोस्टनंतर आता स्वतः विद्यानंद बापट यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय, प्रशासकीय कामे होणार सोपी, 21 जिल्ह्यांत 47 नवी कार्यालये

असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये विद्यानंद बापट यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. तसेच, बापट यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे बापट आगामी काळात निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, याबाबत चर्चा सुरू झाली.

दरम्यान, या चर्चेवर विद्यानंद बापट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आता नाही, पण भविष्यात मी राजकारणात येऊ शकतो,’ असं बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्यातरी निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय नसला, तरी भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही.

संगमनेरमध्ये भरणेंकडून नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी; शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही

काय होती असीम सरोदेंची पोस्ट?

असीम सरोदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरलेली नाही.’ यानंतर त्यांनी विद्यानंद बापट यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

 

आता बापट यांच्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, सध्या निवडणूक लढवण्याचा कोणताही निर्णय नसल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

follow us