पालेकरांच्या हस्ते गौरव, बापटांचा डीजेवाल्यांवर हल्लाबोल; ‘शेण खा, गोमूत्र प्या, पण नागरिकांना त्रास देऊ नका’

Amol Palekar Honours Vidyanand Bapat अमोल पालेकरांच्या हस्ते विद्यानंद बापटांचा गौरव करण्यात आला. या वेळीही त्यांनी ध्वनीप्रदुषणावर टीका केली

Amol Palekar Honours Vidyanand Bapat

Amol Palekar Honours Vidyanand Bapat: पुण्यातील पेठांमधील सणांच्या काळात निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या गौरव सोहळ्यात बोलताना बापट यांनी पुण्यातील पेठांमध्ये सध्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केलं. सणांच्या काळात पेठांमध्ये राहणं नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक झाल्याचं त्यांनी म्हटलं.

‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले

“सध्याच्या काळात पेठांमध्ये राहणं हीच मुळात एक शिक्षा झालेली आहे. सणांच्या काळात तिथलं जीवनमान अगदी असह्य होतं,” असं बापट म्हणाले. ध्वनिप्रदूषण आणि इतर त्रासांमुळे अनेक नागरिक पेठांमधून स्थलांतर करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘त्रास सहन करणाऱ्याला शिक्षा का?’

डीजे आणि मोठ्या आवाजातील संगीताला विरोध केल्यावर ‘त्रास होत असेल तर पेठा सोडून जा’ असं सांगितलं जात असल्याचा उल्लेख बापट यांनी केला. मात्र, त्रास निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्रास सहन करणाऱ्या नागरिकांनाच शहर सोडण्यास सांगणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

“त्रास करणाऱ्याला शिक्षा द्यायची असते, त्रास सहन करणाऱ्याला नाही. उत्सवखोरांच्या डीजेमुळे त्रास होत असेल, तर शिक्षा नागरिकांना करायची की ज्यांच्यामुळे त्रास होतो त्यांना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

2027 वर्ल्डकप माझा शेवटचा असेल; विराट कोहली म्हणाला, ‘ट्रॉफीसाठी सर्वस्व पणाला लावणार’

उत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसून, त्यासाठी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये, ही आपली भूमिका असल्याचंही बापट यांनी स्पष्ट केलं. डीजेमुळे अभ्यासिका आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

विसर्जन मिरवणुकीतील बॅनरवरूनही प्रतिक्रिया

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत काही गणेश मंडळांकडून बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेची खिल्ली उडवणारे बॅनर, एलईडी स्क्रीनवरील फोटो आणि देखावे पाहायला मिळाले होते. ‘विरोध करूनही आम्ही डीजे आणलाच’, असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचं चित्र होतं.

याबाबत विचारलं असता बापट यांनी हा विषय वैयक्तिक नसल्याचं सांगितलं. “माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीचा हा विषय नाही. नागरिकांना त्रास होतोय, हा मुख्य मुद्दा आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

परवानगी मिळाल्याच्या आधारावर ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याची भूमिका योग्य नसल्याचंही बापट यांनी म्हटलं. उत्सव साजरा करण्याचा अधिकार असला, तरी त्यातून इतर नागरिकांना त्रास होऊ नये, याची जबाबदारीही आयोजकांची असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘शेण खाणारे, गोमूत्र पिणारे’ म्हणत बापटांची टीका

“शेण खाऊन तुम्ही गोमूत्राच्या नशेत जे बेधुंद होताय, जनावरांचे मलमूत्र खाणारे हे देवभोळे, धर्मभोळे उत्सवखोर आहेत. त्यांना मिजास कसली असते? परवानगीची. आता जनावरांचं मलमूत्र खातात, कारण परवानगी आहे. खाल्लं खरंच तर सारासार विवेकबुद्धीने श्रीखंड पाहिजे. परवानगी आहे आता. आम्ही जनावरांचं मलमूत्र खात नाही, कुठलंच मलमूत्र खात नाही. पण ते खातात, मिटक्या मारीत जनावरांचं मलमूत्र खातात… म्हणजे विष्ठा खातात आणि गोमूत्र पितात. का खातात? कारण परवानगी आहे.

जरांगे पाटलांचं उपोषण कसं होतं ते वेळ आल्यावर सांगणार; ज्या महिलेने उपोषण सोडलं त्याच महिलेचे गंभीर आरोप

आता ठीक आहे, त्यांचं ते व्यक्तीस्वातंत्र्य मानलं. पण नागरिकांना, आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल अशा गोष्टी तुम्ही करताय. ध्वनिप्रदूषण आणि रहदारीला अडथळा… ते कशाच्या जीवावर करताय? कसल्या उड्या मारतायत? तर तुम्हाला परवानगी दिली, त्याची मिजास आहे. रात्री 12 वाजता बरोबर उतरते ती. बरोबर 12 ते 6 बरोबर उतरते. कोरोना काळात सर्व दिवस उतरलेली होती ती मिजास.

तर ही परवानगीची मिजास त्यांना आहे, ती आम्हाला मोडून काढायची आहे. बाकी काय, शेण खा, कितीही गोमूत्र प्या, ते खाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून त्यापलीकडे काही अपेक्षाच नाही की ते देवभोळे, धर्मभोळे, शेण खाणारे आणि गोमूत्र पिणारे. तर त्यांची परवानगीची मिजास मात्र आम्ही नक्की उतरवू.”  अशा शब्दात विद्यानंद बापटांनी केली.

‘माझी भाषा बदललेली नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय’

यापूर्वी तुलनेने संयमित भाषेत भूमिका मांडणारे बापट यावेळी अधिक आक्रमक शब्दांत बोलताना दिसले. त्यांच्या भाषेतील बदलाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण केवळ वस्तुस्थितीचं वर्णन करत असल्याचं सांगितलं.

शेण खाणे किंवा गोमूत्र पिण्याचे प्रत्यक्ष व्हिडिओ आपण पाहिले असल्याचा दावा करत, बापट यांनी या प्रकारांवर उपहासात्मक टीका केली. हे व्हिडिओ AI जनरेटेड नसून प्रत्यक्षातील असल्याचं ते म्हणाले. अशा कृती आपल्याला हास्यास्पद आणि किळसवाण्या वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखोंची गर्दी, 33 रुग्णवाहिकांनाही मिळाला मार्ग; पोलिसांचा चोख बंदोबस्त

मात्र, या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशा वैयक्तिक कृतींचा परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ नये, यावर त्यांनी पुन्हा भर दिला. “तो बावळटपणा त्यांनी स्वतःपुरता ठेवावा; नागरिकांना ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडीचा त्रास देऊ नये,” असं बापट यांनी एका मुलाखतीत म्हटलं.

बापट यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील डीजे, ध्वनिप्रदूषण आणि उत्सवांच्या आयोजनावरून सुरू असलेली चर्चा पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे.

follow us