Rahuri By Election: तनपुरे ठाम तर मी ही स्पर्धेत; सुजय विखेंचा सूर बदलला

Sujay Vikhe-राहुरीची निवडणूक बिनविरोध होईल असं मी कधीच म्हटलं नाही. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे.

  • Written By: Published:
Sujay Vikhe On Rahuri By Election

Rahuri By Election : अहिल्यानगर – बारामती व राहुरी येथील पोटनिवडणूक ( Rahuri By Election) ही येत्या काही दिवसात पार पडणार आहे. मात्र बिनविरोधच्या चर्चा असलेल्या मतदारसंघांमध्ये आता निवडणुका होतील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच राहुरी मध्ये दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना संधी मिळावी अशी जनभावना होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हेही निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. मात्र यामध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या एका वक्तव्याने या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झालाय.

सर्वेक्षणात मी आघाडीवर…सुजय विखे नेमकं काय म्हणाले ?
राहुरीची निवडणूक बिनविरोध होईल असं मी कधीच म्हटलं नाही. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे. निवडणूक लढवण्याची इच्छा कोणाचीही असेल मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील. भाजप हा सर्वेवर काम करणारा पक्ष आहे. सर्वेमध्ये ज्याचं नाव येईल त्याला आम्ही निवडून आणू. तसेच आजही सर्वे केला तर सर्वेक्षणात आपल्याच क्रमांकाची पसंती मिळेल असेही विखे यांनी उच्चार केला. त्यामुळे राहुरीच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

राहुरीत प्राजक्त तनपुरे इच्छुक
भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झाल्यानं ती जागा रिक्त होती. या जागेवर महाविकास आघाडी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मतदार संघाचा दौरा करून जनभावना जाणून घेत आपण निर्णय घेणार अस तनपुरे म्हणाले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल

दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्यावरती प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. गेली 30 वर्ष जनतेची सेवा करून जी लोकरूपी संपत्ती त्यांनी जमवली आहे तीच संपत्ती आज माझ्या पाठीशी आहे. त्यांचा वारसा घेऊनच मी पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो मी मान्य करेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल असं भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले.

राहुरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला असून निवडणूक बिनविरोध होणार का ? अस झालं नाही तर उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? तसेच विखे व जगताप यांची भूमिका देखील यामध्ये महत्वाची असणार असून अंतिम निर्णय काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us