मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर… एनटी रामारावांचा ‘तो’ प्रसंग अन् ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा
Udhhav Thackeray यांनी मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्यात गैर काय? असं म्हणत एकप्रकारे फडणवीसांना पाठिंबा दिला आहे.
Udhhav Thackeray Support to Devendra Fadanvis for Becoming PM : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे सध्या ज्या ज्या मतदारसंघातील खासदारांनी बंडखोरी केली, त्या-त्या मतदारसंघात सभा घेत आहेत. त्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी खासदार फोडून अमित शाह आणि भाजप हे महाराष्ट्रातील पंतप्रधान पदाचा चेहरा असणाऱ्या फडणवीसांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं म्हणत त्यांनी फडणवीसांच मला काळजी वाटत असून मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्यात गैर काय? असं म्हणत एकप्रकारे फडणवीसांना पाठिंबा दिला आहे. यामुळे ठाकरे फडणवीसांच्या जवळीकीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
एसंशि हे शाह सेना आहे. मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. तसेच मला देवेंद्र फडणवीसांची अत्यंत काळजी वाटते. हे वरवरचं नाही. एखादा महाराष्ट्रातील माणूस पंतप्रदान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्यात गैर काही नाही. या अगोदर नितीन गडकरींच नाव त्यासाठी घेतलं जात होतं. आता फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून पुढे आले आहेत. गडकरींना संघाचाही पाठिंबा होता. तेव्हा त्यांना कारण नसताना बदनाम केलं गेलं. फडणवीसांनाही संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं आहे. असा माणूस रेसमध्ये येऊच नये यासाठी हे कारस्थान सुरू आहे. त्यासाठी शाहसेना आणि एसंशि सुपारी घेऊन काम करतात की, काय? त्यांना तशी सवय असेल कदाचित. म्हणून मी ही चेष्टा नाही करत पण मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते.
सियाचा नवा कारनामा, शॉपिंगसाठी 1 कोटी घेतले अन्… केतन हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
त्याचबरोबर यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्यात गैर काय? तसेच यासाठी त्यांनी एक जुनी आठवण सांगतली. की, ते म्हणाले जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले. तेव्हा ते रामटेकमधून निवडणूक लढवत होते. मात्र ते जेव्हा पतंप्रधान झाले तेव्हा ते खासदार नव्हते. पण ते निवडणूक लढवण्यासाठी आंध्रप्रदेशातील नंदीयाळ या मतदारसंघात गेले. त्यावेळी कट्टर काँग्रेसविरोधी एनटी रामाराव हे मुख्यमंत्री होते. ते म्हणाले की, जर माझ्या आंध्रचा माणूस पंतप्रधान होणार असेल तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे इतर राज्य त्यांच्या अस्मितेचा अभिमान वाळगत असतील तर महाराष्ट्राने ते का बाळगू नये. ही जूनी आठवण सांगत ठाकरेंनी एक प्रकरे फडणवीसांना पाठिंबाच दिला आहे.