Video : ‘जंतर-मंतर सीझन-2’ लवकरच…; CJP संस्थापक अभिजीत दिपकेंचे संकेत

Season 2 of 'Jantar-Mantar' इन्स्टाग्रामवर अनेकजण जंतर-मंतरचा सीझन-2 कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारत होते.

  • Ninad K
  • Written By: Published:
Letsupp Image   2026 08 12T170508.314

Season 2 of ‘JantarMantar‘ Start Very Soon Say’s CJP Founder Abhijeet Dipke : दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून आता पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘जंतर-मंतर सीझन-2’ लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी दिल्लीतील पक्षाच्या स्वयंसेवकांच्या बैठकीसाठी हॉल मिळू न दिल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. इन्स्टाग्रामवर अनेकजण जंतर-मंतरचा सीझन-2 कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारत होते. यावर मी या सर्वांना सांगू इच्छितो की, जंतर-मंतरचा सीझन-2 लवकरच सुरू होणार आहे असे दीपकेंनी सांगितले.

OPD, औषधं अन् तपासण्या विम्यात कव्हर होणार?, समितीच्या मोठ्या शिफारसी

स्वयंसेवकांच्या बैठकीसाठी हॉल मिळवताना अडचणी

CJPकडून बुधवारी दिल्लीत स्वयंसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीसाठी हॉल शोधताना अनेक अडचणी आल्याचा दावा दिपके यांनी केला. ते म्हणाले, आमची आज दिल्लीत स्वयंसेवकांची बैठक होणार होती. त्यासाठी आम्ही हॉल शोधत होतो. मात्र, कुणीही आम्हाला हॉल भाड्याने देण्यास तयार नव्हतं. प्रत्येक ठिकाणी ‘वरून दबाव आहे’ असं सांगितलं जात होतं. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर एक हॉल बुक करण्यात आला आणि त्याची पावतीही पक्षाकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.

हॉल मालकांना धमकी देण्यात आली

हॉल बुक झाल्यानंतर त्याच्या मालकांवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला. CJPची बैठक होऊ दिल्यास हॉल मालकाला धमकी देण्यात आली, असा दावा दीपके यांनी केला आहे. या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही दिपके यांनी केला. “हॉल मालकांना सांगण्यात आलं की CJPची बैठक होऊ दिली तर त्यांना उलटं टांगलं जाईल. हे सगळं भाजप करत आहे, असा आरोप अभिजीत दीपके यांनी यावेळी केला.  कथित दबावामुळे CJP मागे हटणार नसल्याचंही दिपके यांनी स्पष्ट केलं. या प्रकारच्या छोट्या-मोठ्या घटनांमुळे आम्ही घाबरू, असं त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. त्यांच्या कृती आणि वक्तव्यांवरून ते देशातील तरुणांना घाबरत असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा त्यांनी केला.

नीट पेपर लीकच्या मुद्द्यावर CJPच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर यापूर्वी मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर आता पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचे संकेत दिपके यांनी दिले आहेत. मात्र, ‘जंतर-मंतर सीझन-2’ नेमकं कधी सुरू होणार, त्याचा मुद्दा काय असेल आणि आंदोलनाचं स्वरूप काय असेल, याबाबत त्यांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे दिपके यांच्या या घोषणेनंतर CJPच्या पुढील आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us