धीरज परदेशी हत्या प्रकरण: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर नगरमधील ठिय्या आंदोलन मागे
Dhiraj Pardeshi Case: कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू व फास्टट्रॅक कोर्टात चालू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
Dhiraj Pardeshi Case : धीरज परदेशी (Dhiraj Pardeshi) हत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाईल. आरोपींची बेकायदा घरे पाडण्याची योग्य ती प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) दूरध्वनीवरुन आंदोलकांना दिले. त्यानंतर आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर परदेशी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. काही वेळातच नालेगाव अमरधाम येथे अंत्यविधी होत आहे.
महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोमवारी अहिल्यानगर शहरात उमटले. परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी डीएसपी चौकात मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले तसेच संग्राम बापू भंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. धीरज परदेशी यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून हिंदू समाजावर हल्ला असल्याची तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. परदेशी कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी केली. तसेच प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा आणि खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी त्यांनी केली.
हत्येमागील सूत्रधार शोधा-जगताप
अहिल्यानगर शहरातील संशयित आरोपींच्या घरांची झडती घेऊन या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करावी, असेही जगताप म्हणाले.पोलीस प्रशासनाने केवळ किरकोळ आरोपींना ताब्यात घेऊन थांबू नये. या हत्येमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, त्याचा शोध घेणे आवश्यक आहे, असा आक्रमक सूर जगताप यांनी व्यक्त केला. कायदा हातात घेण्याची भाषा न करता प्रशासनाने कठोर आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच पुढचा मोर्चा आम्हाला काढायला लावू नका.आमदार अक्षय कर्डिले यांनी धीरज परदेशी यांच्या हत्येला अहिल्यानगर जिल्ह्यासाठी काळा दिवस असल्याचे म्हटले. बालपणापासून हिंदुत्ववादी विचारांशी जोडलेल्या परदेशी यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला होता, असा दावा त्यांनी केला. मुख्य सूत्रधार सापडत नसतील तर हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. आरोपींना मदत करणाऱ्यांचाही शोध घ्यावा, अशी मागणी कर्डिले यांनी केली. कारवाई न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
चाळीस हजार ठेवीदार फसवणूक प्रकरण; डीएसके म्हणतात…नखाच्या मळा एेवढ्याही माझा गुन्हा नाही
कपाळावरील टिळ्यामुळे हल्ला झाला: पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. परदेशी यांच्यावर त्यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे हल्ला झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील बदलत्या सामाजिक परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी अतिक्रमण, मंदिरांवरील कथित ताबे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, असे सांगितले. संबंधित प्रकरणांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, आंदोलनस्थळी संतप्त घोषणाबाजी करण्यात आली. संशयित आरोपींना मदत करणाऱ्यांचा शोध घ्यावा, त्यांना आर्थिक अथवा अन्य स्वरूपाची मदत कोणी केली याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही पडळकर यांनी मांडली. मात्र, आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; देशविरोधी कारवायांच्या विरोधात आहोत,असे त्यांनी स्पष्ट केले.
E20 पेर्टोलवरून भाजप खासादाराने बाप काढला, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य
मुकुंदनगर येथे भगवे झेंडे व कपाळी टिळा लावून मुकुंद नगर भगवेमय करू: संग्रामबापू भंडारे
संग्राम बापू भंडारे यांनी भावनिक शब्दांत परदेशी कुटुंबाच्या दुःखाला वाचा फोडली. धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या हत्येचे कारण आणि त्यामागील कटाचा पूर्ण तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. धीरज परदेसी यांचा दशक्रिया विधी झाल्यानंतर मुकुंद नगर येथे भगवे झेंडे व कपाळी टिळा लावून मुकुंद नगर भगवेमय करू असे त्यांनी म्हटले आहे.जोपर्यंत पोलीस प्रशासन या प्रकरणातील तपासाबाबत स्पष्ट भूमिका मांडत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. धीरज परदेशी हत्या प्रकरणातील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि कथित सूत्रधार कोण, याचा तपास आता निर्णायक ठरणार आहे.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कालुबर्मे त्यांनी सांगितले की या गुन्ह्यातील सहा आरोपी ताब्यात घेतले आहे. या घाटेनेत ज्या कोणाचा सहभाग पोलीस तपासासमोरील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अपर पोलीस अधीक्षक यांनी दिले.प्रांताधिकारी सुधीर पाटील हे म्हणाले की, धीरज परदेशी यांच्या खुनातील जे काही संशयित आरोपी असतील त्यांचे खाजगी अथवा सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम असणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळ्यात अतिक्रमण काढता येत नाही. मात्र असे आश्वासन देतो की संबंधित असलेल्या आरोपींवर कारवाई नक्कीच होईल असे, त्यांनी म्हटले आहे.
आरोपीचा एन्काऊंटर करा अन्यथा फाशी द्या.
तसेच धीरज यांची पत्नी म्हणाली की माझ्या ढाण्यावाघवर पाठीमागून वर केला. माझ्या नवऱ्याला न्याय द्या. आरोपीचा एन्काऊंटर करा अन्यथा फाशी द्या. त्याशिवाय मी मृदयाला हात लावणार नाही. हिंदुत्ववादी सरकारने मला न्याय द्यावा. आज माझ्या वाघाणे भगवा टिळा लावला म्हणून त्याला मारले. आज मी भगवतीला लावतो तुम्ही मला मारून दाखवा, माझा नवरा माझ्या सोबत नाही. मी सदैव हिंदू सोबत काम करणार आहे. ज्या दिवशी या आरोपी मला सापडतील त्यादिवशी एक कब्रस्तानातं नाही तर अमरधाम येथे नेऊन जळणार असे धीरज परदेशी यांचा भाऊ म्हणाले.
त्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू: फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धीरज परदेशी हत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाईल. आरोपींची बेकायदा घरे पाडण्याची योग्य ती प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरुन आंदोलकांना दिले. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलकांची घोषणा केल्यानंतर परदेशी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. काही वेळातच नालेगाव अमरधाम येथे अंत्यविधी होत आहे.