मोदींना उच्चशिक्षित नेता हवा म्हणून CM फडणवीस केंद्रात जाणार; राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Devendra Fadnavis : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर

Sanjay Raut On Devendra Fadnavis

Sanjay Raut On Devendra Fadnavis : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पंतप्रधान मोदी कुणाला संधी देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सध्या सुरु असणाऱ्या चर्चांनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार आहे. मात्र या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम देत आपण महाराष्ट्राच राहणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावण्याची चर्चा सुरु असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, फडणवीस यांना महाराष्ट्रातून का हलवत आहात? एकनाथ शिंदे हालचाल करत असल्याचे दिसत आहे. 12 वर्षांत प्रथमच मोदी सरकारला एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आणि तोही शिक्षणमंत्र्याचा. शिक्षण खाते देशाच्या तरुण पिढीला घडवणारे खाते आहे. त्या खात्याला वाळवी लागली आहे. नरेंद्र मोदी यांनी या खात्यासाठी दूरदृष्टी असलेला, उच्चशिक्षित नेता हवा, असा विचार केला. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री केंद्रात गेले, तर भाजपची परंपरा दिल्लीतून राज्य करण्याची राहिली आहे. देशाला एक उत्तम शिक्षणमंत्री मिळावा, ही अपेक्षा आहे. फडणवीस काय निर्णय घेतात, हा त्यांचा विषय आहे असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे ढोंगी आहेत

तर दुसरीकडे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत फलकांवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोंचा आकार अमित शाह यांच्या फोटोपेक्षा लहान असल्याने राऊत यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे ढोंगी आहेत असं त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचा इराणवर नियोजित हल्ला रद्द; सौदी अरेबिया ठरलं कारण ? –

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे ढोंगी आहेत. आनंद दिघे यांना गुरु म्हणता, मग बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुमचे नाते काय? स्वागत फलकांवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो दिसत नाहीत. बाळासाहेबांचे फोटो नकोत, असे त्यांच्या मालकांचे मत आहे. हे लोक बाळासाहेब ठाकरे यांना घाबरतात असं देखील राऊत म्हणाले.

follow us