Paper Leak : राज्याच्या शिक्षण खात्यात पैशांचा खेळ सुरु…संजय राऊतांचा गंभीर आरोप

राज्याच्या शिक्षण खात्यात पैशांचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.a

Sanjay Raut (4)

MPSC Paper Leak : राज्याच्या शिक्षण खात्यात पैशांचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून नीटच्या पेपरफुटीवरुन विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. त्यानंतर आता एमपीएससी (MPSC Paper Leak) आणि सीईटीचेही पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आहेत. या संपूर्ण घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, नीटचे पेपर फुटत असताना राज्यात सातत्याने पेपरफुटीची गळती सुरु आहे. एमपीएससी औषध निरीक्षक, टीईटी पेपरफुटी, बोगस डिग्रीचे स्कॅम पुढे आलं आहे. मार्कशीटचा घोटाळा पुढे समोर आला आहे. नव्या शाळेच्या मंजुरीसाठी संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख द्यावे लागतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी आंदोलने केल्यास देवेंद्र फडणवीस आम्हाला शिव्या घालण्याचं काम करत आहेत. आमचं कामच आहे तुम्हाला आरसा दाखवणे पण तुम्ही काय करता आहात. या व्यवस्थेला तुम्हीच जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रियंका गांधी यांनी सवाल उपस्थित केलेले आहे. यावर सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत कोणतंही गांभीर्य दिसत नाही. अजूनही पेपरफुटीचे प्रकार सुरुच आहेत. पेपरफुटीवर आज राहुल गांधी बोलणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागलेले आहे. संसदेत पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलायंच सोडून सत्ताधारी पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर बोलत आहेत, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

’मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये अनासपुरेंच्या कॅमिओची कमाल! एका संवादात गुंफले 15 चित्रपट

महाराष्ट्रात 2 हजार शाळा बंद पडल्या आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यात पेपरफुटी ते शाळांच्या मंजुरीपर्यंत पैशांचाच खेळ सुरु आहे. राज्यात निधी अभावी शाळा बंद पडतात. शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रुपये घेतात. शिक्षणबाह्य कामे शिक्षकांना देतात त्यासाठी नवे शिक्षक भरले पाहिजे. अनेक महिला शिक्षक आजारी पडत आहेत. शिक्षणबाह्य कामे का दिली जात आहेत? असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

व्यवहार विसरून जा अन्यथा… कोट्यवधींची फसवणूक करत जानकरांसह आमदाराच्या जावयाला थेट जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, नीट पेपर लिकवरुन देशभरात आंदोलन पेटल्यानंतर आता एमपीएससी आणि सीईटी पेपर घोटाळा उघड झाला आहे. महाराष्ट्रात सातत्याने पेपरफुटीच्या घटनांवरुन खासदार संजय राऊत यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us