रामराजे निंबाळकर अन् जयकुमार गोरेंचं जुळलं; जुनं वैर विसरले की नवा राजकीय डाव?

Jaykumar Gore-कट्टर विरोधक मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे दोघेही शेजारी बसले आणि दोघांमध्ये गप्पा ही रंगल्या होत्या.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Satara Bank Election

Ramraje Naik Nimbalkar and Jaykumar Gore : हा बैल 25 वर्षे झालं बसलाय, आता तरी बदला, षडयंत्री शकुनी मामा कधीही जिंकला नाही, तसा फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही आणि स्वताच्या पक्षाशी बेईमानी करणारे रामराजे नाईक निंबाळकर सूर्याजी पिसाळांनंतरचे सर्वात थोर गद्दार आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांना जिकडे तिकडे मीच दिसतो. रामराजे झोपेतसुद्धा जयकुमार गोरेच्या नावाने चावळतात शेवटी बायको झोपेतून उठून सांगते जयकुमार गोरे नाही मी आहे इंथ अशी जहरी भाषा जयकुमार गोरेंनी अनेकदा रामराजे नाईक निंबाळकरांविरोधात वापरलीय. रामराजे निंबाळकरांनी जयकुमार गोरेंना प्रत्युत्तर दिलं. पण भाषा थोडी संयमी होती. या दोघांचे वाद टोकाला गेला होते. पण एका कार्यक्रमात दोघे एकत्र आले आणि दोघांमध्ये गप्पाही रंगला. त्याची चर्चा साताऱ्यात सुरू आहे. दोघांमध्ये वैर मिटली की नवा राजकीय डाव आहे, अशी चर्चा आता सुरू आहे.

सातारा जिल्हा बँकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने महायुतीतील घटक पक्षांच्या मेळावा झाला. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यात कट्टर विरोधक मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे दोघेही शेजारी बसले आणि दोघांमध्ये गप्पा ही रंगल्या होत्या. दोघेही जुळवून घेत आहे का ? असा बोललं जात आहे. ते काय जुळवून तेच बघुया…

रामराजे निंबाळकर जुळवून घेणार ?
सातारा जिल्हा बँकेत फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होतेय. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे ही लढत जिल्ह्याच्या राजकारणात सर्वाधिक प्रतिष्ठेची बनलीय. तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नागरी बँका व पतसंस्था या मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झालीय. रणजितसिंह यांचे राजकीय पुनर्वसन होऊन ते बँकेचे अध्यक्ष होऊ शकतात. त्यावेळी दोघांना एकमेंकाची गरज भासू शकते.

तसेच अनेक अर्थकारण जिल्हा बँकेशी अंवलबून असतात. त्यामुळे रामराजे निंबाळकर जुळून घेऊ शकतात. तसेच भविष्यात माढा लोकसभा मतदारसंघासाठी रामराजे निंबाळकरांची गरज जयकुमार गोरे यांना लागू शकतात. तसेच फलटणची आमदार, नगरपालिका रामराजेंची ताब्यात नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रामराजे निंबाळकरांचा मुलगा अनिकेत राजे निंबाळकर हे पराभूत झालेले आहेत. सर्वच बालेकिल्ले रामराजे निंबाळकरांच्या हातातून गेलेले आहेत. भविष्याचा विचार करून ही रामराजे निंबाळकर हे जयकुमार गोरेंशी जुळवून घेऊ शकतात. एकंदरीत दोघांना एकमेंकाची गरज असल्याने दोघेही जुळवून घेऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकाचे मत आहे. पण युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. तसं राजकारणात सगळं माफ असतं का हे ही गोरे आणि रामराजे निंबाळकरच भविष्यात दाखवून देऊ शकतात.

follow us