8 व्या क्रिटिक्स’ चॉइस अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी नामांकन अमृताने व्यक्त केल्या भावना

Amruta Subhash यांना मराठी चित्रपट ‘जारण’ मधील प्रभावी अभिनयासाठी 8व्या Critics’ Choice Awards 2026 मध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीत नामांकन

Amruta Subhash

Amruta Subhash expresses her feelings on being nominated for Best Actress at the 8th Critics’ Choice Awards 2026 : प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) यांना मराठी चित्रपट ‘जारण’ मधील प्रभावी अभिनयासाठी 8व्या Critics’ Choice Awards 2026 मध्ये सर्वोत्तम अभिनेत्री (Best Actress) या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. विविध चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये सखोल आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमृता सुभाष यांच्या या नामांकनामुळे प्रादेशिक कथाकथनाला राष्ट्रीय पातळीवर मिळत असलेल्या वाढत्या मान्यतेचीही नोंद घेतली जात आहे.

सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर रंगमंचावर; ‘ॲनिमल’ मध्ये दुहेरी भूमिका अन् सलग प्रयोगांची मालिका

या नामांकनाबद्दल बोलताना अमृता सुभाष म्हणाल्या, “क्रिटिक्स’ चॉइस अवॉर्ड्सचे नामांकन माझ्यासाठी नेहमीच खास असते. 2024 मध्ये Lust Stories 2 साठी मला हा पुरस्कार मिळाला होता आणि तेव्हा मी माझ्या भाषणात सांगितले होते की देशभरातील समीक्षक जेव्हा एकत्र येऊन तुमच्या कलेला दाद देतात, तेव्हा ती खूप मोठी आणि मौल्यवान दखल असते. कोणत्याही कलाकारासाठी समीक्षकांकडून मिळालेली अशी थाप खूप महत्त्वाची असते. यावेळी हे नामांकन आणखी खास आहे कारण ते ‘जरन’ या मराठी चित्रपटासाठी आहे.

सिलेंडरचा तुटवडा ! गॅस बचतीच्या सोप्या टिप्स जाणून घ्या…

हा चित्रपट आम्ही कोणत्याही मोठ्या स्टुडिओच्या पाठबळाशिवाय स्वतंत्रपणे बनवला आहे. प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम दिले आणि चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे आणि हे नामांकन तर आणखीच विशेष आहे. हे नामांकन फक्त माझ्यासाठी नाही, तर आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीची दखल आहे. क्रिटिक्स’ चॉइस अवॉर्ड्स विविध भाषांतील चित्रपट आणि शो यांना एकाच व्यासपीठावर सन्मानित करतात, त्यामुळे हा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे आणि त्यामुळे तो आमच्यासाठी अधिकच खास आहे.”

98 चित्रपट दिग्दर्शित केले पण… प्रियदर्शनकडून‘भूत बंगला’मध्ये एकतासोबतच्या कामाचा अनुभव शेअर

‘जरन’ या चित्रपटामध्ये अमृता सुभाष यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही भावली आहे. कोणत्याही मोठ्या स्टुडिओच्या पाठबळाशिवाय स्वतंत्रपणे बनवलेल्या या चित्रपटाला त्याच्या कथानक आणि प्रभावी अभिनयासाठी मोठी दाद मिळाली असून प्रेक्षकांनीही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

ऑस्करची ट्रॉफी विकता येते! खरेदीचा नियम कुणाच्या नावे, बदललेला नियम काय?

Film Critics Guild तर्फे आयोजित आणि WPP Motion Entertainment यांच्या सहकार्याने होणारे *क्रिटिक्स’ चॉइस अवॉर्ड्स* हे भारतातील चित्रपट समीक्षकांचे पहिले आणि एकमेव नोंदणीकृत संघटन आयोजित करणारे पुरस्कार सोहळे आहेत. या पुरस्कारांद्वारे फीचर फिल्म्स, वेब सिरीज, डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म्समधील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला जातो. देशभरातील 56 नामांकित चित्रपट समीक्षकांच्या ज्युरीद्वारे या पुरस्कारांसाठी मतदान केले जाते. क्रिटिक्स’ चॉइस अवॉर्ड्स 2026 विविध भाषा आणि फॉरमॅट्समधील प्रभावी कथाकथनाला व्यासपीठ देत भारतीय सिनेमातील सर्जनशीलता, वैविध्य आणि उत्कृष्टतेचा गौरव करत राहतील.

follow us