T20 World Cup दरम्यान दक्षिण आफ्रिकेने केली मोठी घोषणा, बदलला कर्णधार; कारण काय?
NZ Vs SA : आजपासून टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 ची सुरुवात होत असून कोणते चार संघ पुढच्या फेरीत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
NZ Vs SA : आजपासून टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 ची सुरुवात होत असून कोणते चार संघ पुढच्या फेरीत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने मोठी घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डकडून न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका 15 मार्च ते 25 मार्च दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. यासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून या संघाचा कर्णधार म्हणून केशव महाराजची (Keshav Maharaj) नियुक्ती करण्यात आली आहे. तर या संघात पाच नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन खेळाडूंमध्ये फलंदाज कॉनर एस्टरहुइझेन, डायन फॉरेस्टर आणि जॉर्डन हरमन यांचा समावेश आहे. तर अष्टपैलू इथन बॉशचाही संघात (NZ Vs SA) समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर SA20I मध्ये प्रभावी कामगिरीनंतर वेगवान गोलंदाज न्कोबानी मोकोएनाची निवड करण्यात आली आहे. या 19 वर्षीय खेळाडूने पार्ल रॉयल्ससाठी 10 सामन्यांमध्ये 9.62 च्या इकॉनॉमी रेटने 13 विकेट घेतले होते. या हंगामात तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) टी20 विश्वचषक 2026 संघात निवडलेल्या तीन खेळाडूंपैकी महाराज एक आहेत, त्यांच्यासोबत डावखुरा फिरकीपटू जॉर्ज लिंडे आणि जेसन स्मिथ आहेत.
गेराल्ड कोएत्झी आणि टोनी डी झोर्झी यांचे पुनरागमन
दरम्यान, ऑक्टोबर 2025 मध्ये नामिबियाविरुद्ध खेळल्यानंतर पहिल्यांदाच वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी यांची दक्षिण आफ्रिकेच्या टी20 संघात निवड झाली आहे. उजव्या पायाच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर फलंदाज टोनी डी झोर्झीचीही निवड झाली आहे. पाच सामन्यांची मालिका माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे सुरू होत आहे. त्यानंतरचे सामने हॅमिल्टन, ऑकलंड, वेलिंग्टन (स्काय स्टेडियम) आणि क्राइस्टचर्च येथे खेळवले जातील.
सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पण ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा; अमेरिकेत पुन्हा ‘टॅरिफ वॉर’ची घोषणा
दक्षिण आफ्रिका संघ
केशव महाराज (कर्णधार), ओटनील बार्टमन, एथन बॉश, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, कोनोर एस्टरहुइझेन, डायन फॉरेस्टर, जॉर्डन हरमन, रुबिन हरमन, जॉर्ज लिंडे, न्कोबानी मोकोएना, अँडिले सिमलेन, लुथो सिपामला, प्रेनेलन सुब्रायन आणि जेसन स्मिथ.
