भाविकांनो लक्ष द्या! तुळजाभवानी मंदिर आता फक्त 19 तास खुलं, वेळेची मर्यादा…

भाविकांनो लक्ष द्या! तुळजाभवानी मंदिर आता फक्त 19 तास खुलं, वेळेची मर्यादा…

Tulja Bhavani Temple Will Open For 19 Hours : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री तुळजाभवानी (Tulja Bhavani) देवीचं तुळजापूर येथील मंदिर म्हणजेच संपूर्ण राज्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, आता या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने उघडण्याच्या वेळेत मोठा बदल करत गर्दीच्या (Tulja Bhavani Temple) दिवशी मंदिर केवळ 19 तासच खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जो याआधी 22 तास सुरू (Tuljapur) असायचा.

भक्तांवर परिणाम होणार?

या नव्या निर्णयामुळे विशेषत: गर्दीच्या दिवशी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार (Tulja Bhavani Temple Time Change) रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी मंदिर पहाटे 1 वाजता नव्हे, तर 4 वाजता उघडण्यात येणार आहे. तसेच इतर साध्या दिवशी म्हणजे सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी मंदिर सकाळी 6 वाजता उघडेल.

उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती; संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता भूमिका काय? म्हणाले…

दर्शनाची संधी मर्यादित

या बदलामुळे भाविकांना पहाटेच्या वेळेत दर्शन घेण्याची संधी मर्यादित होणार आहे. त्यामुळे पुजारी वर्ग, स्थानिक दुकानदार आणि भक्तगणांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं आहे. अनेकांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणीही केली आहे.

शिंदे गटाच्या चार नेत्यांची SIT चौकशी करा; संजय राऊतांनी थेट नावं घेत CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी

नियोजन बिघडण्याची शक्यता

गर्दीच्या काळात भक्तांची मोठी संख्या पाहता, मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने वेळ कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, या निर्णयामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दूरदूरून येणाऱ्या भक्तांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. गर्दीच्या दिवशी हजारो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात.
पण वेळ कमी केल्यामुळे भक्तांची अडचण वाढण्याची शक्यता.पुजारी वर्ग आणि स्थानिक भाविक या निर्णयाला विरोध करत असून प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील वेळेत बदल भाविकांना किती सोईचं ठरेल? हे येणाऱ्या काळातच कळेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube