आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा, मल्हार पाटलांचं खासदार ओमराजेंना ओपन चॅलेंज
आमदार राणा जगजितसिंह यांच्या मुलाने म्हणजेच मल्हार पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना चिमटा काढला.
Open challenge BJP’s Malhar patil to MP Omraje Nimbalkar : काल राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात देखील अंतिम निकाल जाहीर झाले असून या निकालाबरोबरच जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये देखील याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर(MP Omraje Nimbalkar) यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सगळ्याच नगरपरिषदांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याउलट भाजप(BJP) आणि शिवसेनेने(Shivsena) जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणत राजकीय प्राबल्य सिद्ध केलं आहे. दरम्यान आमदार राणा जगजितसिंह यांच्या मुलाने म्हणजेच मल्हार पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना चिमटा काढला आहे.
विकासाच्या मुद्द्यावर बोट ठेवत मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांवर सडकून टीका केली आहे. धाराशिवमध्ये पूर्वी अनेक वर्षांपासून रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट होती. त्यामुळे जनता देखील विकासाच्या बाजूने उभी राहिली होती. शहरात चांगलं आणि प्रगतशील असं काहीतरी घडावं, असं स्वपन प्रत्येक शहरवासीय पाहत होता. याच अपेक्षेतून जनतेने भाजपवर विश्वास दाखवला असून त्यांच्या या विश्वासाबद्दल आणि मनापासून ऋणी असल्याचं यावेळी ते म्हणाले.
लवासा कथित गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा दिलासा
विरोधकांनी जरी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली असली तरी, जनतेने भाजपला ठामपणे साथ दिली आहे. निवडणुकीतील यशाबद्दल बोलताना पुढे ते म्हणाले की, या मतदारसंघातील आमदार आणि जिल्ह्याचे खासदार सातत्याने आमचा माज उतरवणार, भाजपच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकर्ते आणि मल्हार पाटील यांचा माज उतरवणार अशी भाषा करत होते. मात्र मायबाप जनतेने त्यांची माज-मस्ती खड्डे पडलेल्या रस्त्यावर नेऊन टाकली आहे.
दरम्यान मी या दोन्ही लोकप्रतिनिधींना, जे जनतेतून निवडून आले आहेत, त्यांना खुलं आव्हान देतो. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी या दोन्ही खासदारांना आणि भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे. तुमच्यात जर धमक असेल तर उबेथचा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणून दाखवा, धमक असेल तर आईस्क्रीम कोणचा अध्यक्ष निवडून आणून दाखवा, असं ओपन चॅलेंज यावेळी मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना दिलं आहे.
