महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये भाजपला भरघोस यश; मोदींकडून मराठीत ट्विट करत जनतेचे आभार
PM Modi यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतींतील महायुतीआणि भाजपच्या यशासाठी मराठीमधून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
PM Modi thanks people by tweeting in Marathi for BJP’s success in Maharashtra Municipal Councils/Narpanchayats: राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल (Election) रविवारी 21 डिसेंबर 2025 रोडी हाती आले आहेत. यामध्ये महायुतीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपने समोर आलेल्या आकडेवारीनुसार 288 पैकी 117 नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर बाजी मारली आहे. त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले .
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो. असं म्हणत मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आणि पुन्हा एकदा विकासाचा शब्द दिला.

महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक… https://t.co/X5jmfpb3M8
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2025

पाच कारणे ज्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजपच विजयी होतो…
राज्यातील 288 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाला जाहीर झाला असून राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 288 पैकी 117 नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर बाजी मारली आहे. तर महायुतीमधील दुसरे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.
‘काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून काम केलं’, पराभवानंतर आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे. तर आता विरोधकांकडून प्रत्येक निवडणुकीत भाजपच का विजयी होतो? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याची पाच कारणं सांगता येतात. त्यामध्ये लाडकी बहीण योजना, प्रचाराचं नियोजन, युतीचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रिंगणात, निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी यांचा उल्लेख करता येतो.