लवासा कथित गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा दिलासा
शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची लावासातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.
Lavasa case bombay high court dismisses pil : राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील लवासा गैरव्यवहार प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांच्या विरोधाचे उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात शरद पवार,अजित पवार(DCM Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे यांची लावासातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली असून उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हा पवार कुटुंबासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीतील विजयी जल्लोषाला गालबोट; नवनिर्वाचित नगरसेवकांसह 16 जण भाजले
लवासा गैरव्यवहाराचं प्रकरणं काय आहे?
पुण्यापासूनजवळच असलेला मुळशीमध्ये लवासा हा खासगी हिल स्टेशन प्रकल्प उभा करण्यात आला होता. नंतर हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला. नानासाहेब जाधव यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पवार कुटुंबियांवर या याचिकेतून अनेक आरोप करण्यात आले होते. लवासा प्रकल्पाला परवानगी देताना तत्कालीन मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता.
त्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून या प्रकल्पाला झुकत माप दिलं असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंडा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सर्व बाजू पाहिल्यानंतर आज निकाल दिला आहे. याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे समोर आलेले नसल्याचं कारण देत ही याचिका फेटाळण्यात आली असल्याचं यावेळी कोर्टाकडून सांगण्यात आलं.
