पवार सांगताय त्यात तथ्य, आमच्या कानावर कुजबूज… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सरनाईकांचा दुजोरा
Pratap Sarnaik यांनी देखील शरद पवार विलीनीकरण करण्याबाबत वारंवार जे सांगतात त्यामध्ये तथ्य आहे. असं म्हणत विलीनीकरणाला दुजोरा दिला आहे.
Sharad Pawar is telling the truth Shivsena Minister Pratap Sarnaik backs NCP’s merger talks : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना सुरू आहेत. (Baramati) त्यावर अनेक गोष्टी दोन्ही बाजूने मांडल्या जात आहेत. एकत्रिकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती असा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र अशी चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये आता मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी देखील विलीनीकरणाच्या चर्चांना दुजोरा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती आहे. विलीनीकरणाची कुजबुज आमच्या कानावर आली होती. शिवाय शरद पवार विलीनीकरण करण्याबाबत वारंवार जे सांगतात त्यामध्ये तथ्य आहे. अगोदर चर्चा नाही असे म्हणणारे शरद पवार अजित पवारांच्या अकाली जाण्याने वारंवार सांगत आहेत की चर्चा होत होती. त्यामध्ये तथ्य आहे. मात्र हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यावर जास्त भाष्य करणार नाही. मात्र ही वस्तुस्थिती असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार गटाचा मोठा निर्णय, एकाच नेत्याला सर्व अधिकार
दुसरीकडे शरद पवार विरूद्ध अजित पवार गट असं विलीनीकरणाच्या दोन बाजू पडल्या आहेत. त्यावर आता 9 तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे संपर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजितदादांच्या विमान प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, अमोल मिटकरींची मागणी
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘मी आमच्या पक्षाबद्दलच बोलणार आहे. मी कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर बोलणार नाही. माझ्या परीने एवढंच सांगतो की, मी आमच्या पक्षात अजितदादांनंतर पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या सुसंगत राहिली. तेव्हाच 2023 रोजी आम्ही निर्णय केला. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी चालली. आमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
