दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार गटाचा मोठा निर्णय, एकाच नेत्याला सर्व अधिकार

दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणारवर लवकरच चित्र स्पष्ट होईल अशी बातमी समोर आली आहे. आता शरद पवार गटाने तशी भूमिका घेतली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 02 03T220907.448

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना सुरू आहेत. (Baramati) त्यावर अनेक गोष्टी दोन्ही बाजूने मांडल्या जात आहेत. एकत्रि‍करणाबाबत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती असा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र अशी चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या एकत्रिकरणाच्या चर्चेदरम्यान आता शरद पवार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

9 तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे संपर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘मी आमच्या पक्षाबद्दलच बोलणार आहे.

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडं बीड अन् पुण्याचं पालकमंत्रीपद

मी कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर बोलणार नाही. माझ्या परीने एवढंच सांगतो की, मी आमच्या पक्षात अजितदादांनंतर पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या सुसंगत राहिली. तेव्हाच 2023 रोजी आम्ही निर्णय केला. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी चालली. आमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

पुढे बोलताना पटेल म्हणाले की, ‘अजित पवार यांनी याआधी अनेक मुलाखती दिलेल्या आहेत. विलीनीकरणाबाबत त्यांची माझ्यासोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. विलीनीकरणावर चर्चा झाली असती तर त्याबाबत आम्हाला माहिती नाही, असं होऊच शकत नाही. मी अजितदादांच्या दोन मुलाखती पाहिल्या आहेत. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्यासमोर विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. फक्त स्थानिक स्वराज्यसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती होती’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

follow us