‘आम्ही मैदानात कुठेही नसणार…’ महाराष्ट्र केसरीवर रोहित पवार स्पष्टचं बोलले, सगळंच सांगितलं

‘आम्ही मैदानात कुठेही नसणार…’ महाराष्ट्र केसरीवर रोहित पवार स्पष्टचं बोलले, सगळंच सांगितलं

Rohit Pawar Press Conference On Maharashtra Kesari : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची (Rohit Pawar) आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेवर (Maharashtra Kesari Kusti Spardha) वक्तव्य केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आर्थिक मदत केली गेली. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी कर्जत जामखेडला आलेली आहे.

आम्ही महाराष्ट्र केसरीचे आयोजन करत आहोत. मात्र, नियोजन महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद करत आहे. पंचाचे नियोजन आपल्या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. 26 ते 30 ही स्पर्धा होणार आहे. खेळात राजकारण येऊ (Maharashtra Kesari) नये. या स्पर्धेचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती यांना पत्र लिहून निमंत्रण दिलेलं आहे. याचबरोबर सर्व आमदारांना निमंत्रण असणार आहे. खेळात राजकारण येणार नाही. कुठल्याही पैलवानावर अडचण येणार नाही. पंचांना कुठलिही अडचण येणार नाही खेळाडूंना अडचण येणार नाही, असं आश्वासन देखील रोहित पवार यांनी दिलंय.

माझी गॅरंटी घेवू नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांना नेमकं म्हणायचं काय?

या स्पर्धेत 750 ते 800 नामंकित पैलवान सहभागी होतील. सभापती हे संविधानीक पद आहे, राजकारण नाही. विनंतीला मान देऊन साहेब येतील. दोन दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ नये, ही सर्वांची इच्छा (Maharashtra Kesari) आहे. मात्र पारंपारीक स्पर्धा होत असताना त्याला मान द्यावा. दोन स्पर्धा झाल्यास त्या स्पर्धेचा मान राहायला हवाय. या स्पर्धेदरम्यान व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. परिषद जे बोलेल, तिथे त्या गोष्टी केल्या जातील. आम्ही मैदानात कुठेही नसणार, असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.

प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार , ‘गुलकंद’ मधील ‘चंचल’ प्रेमगीत रिलीज

चंद्रहार पाटील यांच्याप्रमाणे आमचंही तेच मत आहे, एकच स्पर्धा व्हावी. निकालाबाबत चुकीच्या गोष्टी झाल्या, हे सर्वानी पाहिलं. पैलवानांनी आक्षेप घेतले. पवार साहेब देखील स्पर्धेवेळी असणार, असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. कुस्तीवरील प्रेम आणि इतिहास जपण्याचं काम आम्ही करतोय. तुकोबारायांच्या पादुकाही तिथे आणणार आहे. भक्ती आणि शक्तीचं प्रतिक म्हणून स्पर्धा आणि अध्यत्मिक दोन्ही कार्यक्रम होतील, असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube