भगवी टोपी भगवा पंचा बदलता पेहराव…तनपुरे भाजपच्या वाटेवर?

Prajakt Tanpure यांचा भगवा पंचा भगवी टोपी हा गेल्या काही दिवसांमधील बदललेला पेहराव वेगळ्या राजकीय वाटचालीचे संकेत देत आहे.

Prajakt Tanpure

NCP Sharad Pawars Prajakt Tanpure on the way of BJP saffron hat saffron pancha changing attire : अहिल्यानगरच्या राहुरी येथे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच सुरू असलेल्या काही हालचालीमुळे बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा जोरदार सुरू आहे. एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकणारे अक्षय कर्डिले व प्राजक्त तनपुरे हे अनेकदा सोबत दिसले. तसेच गेल्या काही दिवसांमधील तनपुरे यांचा बदललेला पेहराव भगवा पंचा भगवी टोपी हे देखील वेगळ्या राजकीय वाटचालीचे संकेत देत असल्याचे देखील बोलले जात आहे. यामुळे प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या मतदार संघात सुरू आहे.

अजितदादांच्या विमान अपघातावर व्ही के सिंगचा धक्कादायक जबाब! सीआयडी चौकशीत घेतलं थेट नाव…

राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले व आता राहुरी येथे पोटनिवडणूक होणार असून येत्या काही दिवसांमध्ये त्याच्या तारखा देखील जाहीर होणार आहे. निवडणूक जशी जशी जवळ येतीये तस तसा राजकीय हालचालींना देखील आता वेग प्राप्त झाला असून नव्या राजकीय समीकरणामुळे सध्या हा मतदारसंघ चांगला चर्चेत आला आहे.

युद्धामुळे तेलाचा भडका! कच्च्या तेलाच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरल पार, जगावर मंदीचं सावट?

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशी इच्छा माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे  तनपुरे मतदारसंघात झालेले सक्रिय पाहता कर्डिले विरुद्ध तनपुरे असाच सामना होऊ शकतो अशी चर्चा रंगली होती. मात्र हे सगळं सुरू असतानाच अजेंडा घेत तनपुरे व कर्डिले हे अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले. यामुळे तनपुरे यांचा बदलता पेहराव, बदलती भूमिका ही भाजपच्या विचारसरणीशी जुळून येती की काय व येणाऱ्या काळात तनपुरे भाजपात येथील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकार आपलंच आमचे दहा जण तुमच्याकडे येतील

गुहा येथे एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त अक्षय कर्डिले व प्राजक्त तनपुरे हे एकत्र आले होते. यावेळी प्राजक्त तनपुरे यांच्या सूचक भाषणामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरणं बदलू शकतात. यावेळी तनपुरे म्हणाले, सरकार आपले आहे. महायुतीकडे 240 आमदार त्याच्यात आमचे दहा तुमच्याकडे आले तर 250 आमदार होतील. येणाऱ्या काळात कोण आमदार होईल मला माहित नाही. पण त्यांनी या गोष्टींसाठी आवाज उठवला पाहिजे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी कुठल्या पक्षात आहे. हे मला अजून माहिती नाही. असं बोलत एक प्रकारे तनपुरे यांनी सुचक वक्तव्य देखील केले. यामुळे कर्डिले-तनपुरे यांचे एका मंचावरती येणे यातून येणाऱ्या काळात विखेंच्या मध्यस्थीने तनपुरे हे भाजपात दिसतील अशी चर्चा रंगली आहे.

अक्षय कर्डिले यांना शुभेच्छा…मला घाई नाही

राहुरी मतदारसंघातील गुहा या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमात कर्डिले व तनपुरे एकत्र आले होते. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले या ठिकाणी आम्ही राजकीय मंडळी म्हणून नाही तर धार्मिक कार्यक्रमात एकत्र आलो आहोत. अक्षय कर्डिले आमदार होणार त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, मला एवढी घाई नाही. याबाबत मी राजकीय मंचावर बोलेल. असे देखील यावेळी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.

भगवा पेहराव, हिंदुत्वाचा अजेंडा, बदलती भूमिका

विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका देखील एक चर्चेचा विषय ठरला होता.  जगतापांचा बदलता पेहराव भगवा पंचा, भगवी टोपी यामुळे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जगताप पुढे जात आहे. आता त्यांच्या पाठोपाठ तनपुरे यांचा देखील बदलता पेहराव वेगळ्या राजकीय वाटचालीचे संकेत देत आहे. जर असे झाले तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे. कारण पवारांच्या तालमीत तयार झालेले तनपुरे हे भाजपसाठी एक महत्त्वाचा चेहरा ठरू शकतात.

राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध की तनपुरे उमेदवार

राहुरी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होणार असून प्राजक्ता तरपुरे व अक्षय कर्डिले दोघेही जोरदार तयारी करत आहेत. कर्डिलेंच्या निधनानंतर अक्षयला संधी द्यावी अशी मागणी आहे. मात्र अक्षय कर्डिलेंकडे असलेला अत्यल्प अनुभव व निगेटिव्ह सर्व्हे यामुळे भाजप या जागेबाबत विचार करण्याची शक्यता आहे. तर तनपुरे यांच्या भाजप प्रवेशासाठी सुरू असलेल्या हालचाली पाहता तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आली तर अक्षय कर्डिलेंची विधान परिषदेवर वर्णी लागू शकते. अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुरी मतदारसंघात कोणती राजकीय समीकरणे बदलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us