अजितदादांच्या विमान अपघातावर व्ही के सिंगचा धक्कादायक जबाब! सीआयडी चौकशीत घेतलं थेट नाव…

VK Singh on Ajit Pawra's plane crash व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांनी अजितदादांच्या अपघातावर धक्कादायक जबाब दिल्याचं पाहायला मिळालं

VK Singh On Ajit Pawra's Plane Crash

VK Singh’s shocking response on Ajit Pawra’s plane crash! CID questions him for three consecutive days : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात व्हीएसआर कंपनी आणि कंपनीचे मालक रोहित सिंगवर अनेक गंभीर आरोप करत हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीने (CID) पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. यामध्ये त्यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर धक्कादायक जबाब दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अपघाताची जबाबदारी आपली नसल्यांच सांगितंलं आहे.

अजितदादांच्या विमान अपघातावर व्ही के सिंगचा धक्कादायक जबाब!

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सीआयडीने (CID) पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांची सलग तीन दिवस चौकशी केली त्यामध्ये यामध्ये त्यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर धक्कादायक जबाब दिल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक आहे. अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा. त्यांच्या या धक्कादायक उत्तरांमुळे त्यांच्या बेजबाबदार पणावर टीका केली जात आहे.

रोहित सिंहला शाही पाहुणचार?

दरम्यान या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीने (CID) काल पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांनी चौकशीसाठी बोलवलं होतं मात्र यावेळी रोहित सिंगला शाही पाहुणचार देण्यात आला असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय.

युद्धामुळे तेलाचा भडका! कच्च्या तेलाच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरल पार, जगावर मंदीचं सावट?

सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली.. यामागं काय काळंबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही.

follow us