खोटं बोलण्याची सवय अन् अटक कोणत्या परिस्थितीत? माफीचा साक्षीदार पारसमल जैनवर न्यायालयाचा सवाल
Pawanraje Nimbalkar murder case तील माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या कबुलीजबाबाबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
Pawanraje Nimbalkar murder case Court questions approver Parasmal Jain : गेल्या 20 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेल्या विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकालावर सुनावणी सुरू आहे. मात्र या प्रकरणामध्ये पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालादरम्यान न्यायालयाने माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या कबुलीजबाबाबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे याचा निकालावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पारसमाल जैनच्या कबुली जबाबावर न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालादरम्यान न्यायालयाने माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या कबुलीजबाबाबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. जैन याला 2009 मध्ये क्राईम ब्रांचने ताब्यात घेतल्यानंतर अनेक महिने बेकायदेशीरपणे ठेवण्यात आल्याचा दावा त्याने केला होता. या संदर्भात सरकारकडे कोणताही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, पारसमाल जैनला अटक कशी झाली आणि कोणत्या परिस्थितीत त्याने कबुलीजबाब दिला, या सर्व बाबींचा सखोल विचार करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. निकाल वाचनादरम्यान या मुद्दयावर विशेष चर्चा करण्यात आली.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडात अण्णा हजारेंची साक्ष का? पारसमल जैन माफीचा साक्षीदार कसा ठरला?
त्याचबरोबर पुढे कोर्टाने म्हटले की, माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. साक्षीदाराने आर्थिक व्यवहार, शूटरला दिलेली रक्कम, शस्त्र खरेदी आणि आरोपींशी झालेल्या भेटींबाबत वेळोवेळी आपली विधाने बदलल्याचे न्यायालयाने नमूद केले.
पवनराजे हत्याकांड LIVE : माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय – कोर्ट
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, साक्षीदाराने पद्मसिंह पाटील यांना मलबार हिल येथील बंगल्यात भेटल्याचा दावा केला, मात्र तेथे त्यांचा बंगला नसून कुलाबा येथे फ्लॅट होता. तसेच बिहारमधून शस्त्रे आणल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे किंवा प्रवासाची नोंद उपलब्ध नाही. राकेश मारिया यांच्या संदर्भातील दाव्यांचीही पडताळणी न झाल्याने या साक्षीदाराची साक्ष गृहीत धरण्याजोगी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
पारसमल जैन माफीचा साक्षीदार कसा ठरला?
या प्रकरणाचा खुलासा करणारा 9 आरोपींपैकी एक असलेला पारसमल जैन या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार बनला आहे कारण त्याने सीबीआयच्या कोर्टात सर्व माहिती मांडणे आणि सत्य सांगणे या अटीवर माफीचा साक्षीदार बनला होता. त्यासाठी त्याने सीबीाय कोर्टत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला मंजूरी दिली.