सातारा जिल्हा बँक निवडणूक; अटीतटीच्या लढतीमध्ये पालकमंत्री शुंभूराज देसाई विजयी

Shambhuraj Desai : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला असून पालकमंत्री शुंभूराज देसाई

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Shambhuraj Desai

Shambhuraj Desai : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला असून पालकमंत्री शुंभूराज देसाई (Shambhuraj Desai) विजयी झाले आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकरांचा (Satyajitsinh Patankar) पराभव केला आहे. या विजयानंतर तब्बल 42 वर्षानंतर पाटममध्ये पुन्हा देसाई गटाने बाजी मारली आहे. विजयानंतर देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

प्रतिष्ठेची मानली जात असलेल्या या लढतीमध्ये अखेर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारली आहे. तर भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना पराभव स्विकारावा लागला आहे. बँकेच्या मागील निवडणुकीत गृहराज्यमंत्री असताना शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला होता. सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांचा पराभव केला होता. शंभूराज देसाई यांना 44 मते, तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 58 मते मिळाली होती. तब्बल 14 मतांनी पाटणकर विजयी झाले होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक (Satara District Bank Election) होत आहे. त्यापैकी 9 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 12  जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात होते.  1 नोव्हेंबर 2026 रोजी मतदान पार पडले. तब्बल 97.92 टक्के मतदान झाले असून 2,021 मतदारांपैकी 1,979 मतदारांनी मतदान केले.

अमेरिका – इराण पुन्हा संघर्ष पेटला; क्यूशम बेटावर अमेरिकेचा हल्ला-

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत 9 जागा बिनविरोध

या निवडणुकीसाठी बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये मकरंद पाटील, डॉ. अतुल भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सर्जेराव सावंत, नंदकुमार मोरे, सत्यजित वीर, ऋतुजा पाटील, मंगल पाटील आणि सोमनाथ धुमाळ यांचा समावेश आहे.

follow us